घरक्रीडाCSK vs GT, IPL 2023 : शेवटच्या २ चेंडूत जडेजाने चालवली तलवार,...

CSK vs GT, IPL 2023 : शेवटच्या २ चेंडूत जडेजाने चालवली तलवार, गुजरातला चारली धूळ

Subscribe

आयपीएल २०२३ (IPL 2023)च्या १६ व्या हंगामात क्रिकेट प्रेमींकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. काल(सोमवार) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायट्न्स (CSK vs GT) यांच्यात शेवटचा आणि अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात चेन्नईनं गुजरात संघाचा पराभव केला आणि चेन्नई संघ आयपीएल २०२३ चा महाविजेता ठरला. या सामन्यात सर्वाधिक कमालीची खेळी कोणी केली असेल तर तो म्हणजे रवींद्र जडेजा(Ravindra Jadeja). अष्टपैलू रवींद्र जडेजाने शेवटच्या २ चेंडूत आपली तलवार चालवली आणि गुजरातला धूळ चारली.

शेवटच्या ओव्हरमधील थरार

गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माची (Mohit Sharma) शेवटची म्हणजेच २० वी ओव्हर सुरू होती. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी १३ धावांची गरज होती. ६ चेंडूत १३ धावा. मग जडेजाने आपल्या बुद्धीचा आणि बळाचा वापर करत तलवार बाहेर काढली आणि २ चेंडूत षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईने सामना जिंकला.

पहिला चेंडू – निर्धाव
दुसरा चेंडू – एक धाव
तिसरा चेंडू – एक धाव
चौथा चेंडू – एक धाव
पाचवा चेंडू – षटकार
सहावा चेंडू – चौकार

- Advertisement -

चेन्नईला नवीन टार्गेट आणि….

गुजरात संघानं २० ओव्हर्समध्ये २१४ धावा केल्या होत्या आणि चेन्नईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज होती. पण सामना चालू असताना पाऊस धो धो बरसला आणि तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी देखील दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. सामन्याला दुसऱ्या दिवशी १२ वाजून १० मिनिटांनी सुरूवात झाली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आलं. यावेळी चेन्नईला १७१ धावांचं आव्हान देण्यात आलं आणि हे आव्हानं संघानं पूर्ण केलं.

- Advertisement -

चेन्नईची धडाकेबाज कामगिरी

चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेता गुजरात टायटन्स संघ एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरला. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज फलंदाजी करत चेन्नई संघासमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले. या हंगामात दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. साई सुदर्शन याच्या झंझावाती ९६ धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित २० ओव्हर्समध्ये चार विकेटच्या मोबद्लयात २१४ धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने ५४धावांचे योगदान दिले.


हेही वाचा : IPL 2023 Final : अंतिम सामन्यात गुजरातचे CSK संघासमोर 215 धावांचे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -