घरक्रीडाENG VS IND TEST SERIES : रवींद्र जडेजाचा इंग्लंड विरुद्ध पराक्रम

ENG VS IND TEST SERIES : रवींद्र जडेजाचा इंग्लंड विरुद्ध पराक्रम

Subscribe

याआधी तीन भारतीयांनी केली अशी कामगिरी

भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. सोमवारी लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने १५७ धावांनी विजय मिळवला. रवींद्र जडेजाने इंग्लंड विरुद्ध ओवल कसोटी सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करत कमाल केली आहे. त्याने या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद करत नवा कारनामा केला आहे. जडेजा इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात ५० विकेटस् आणि ५०० धावा करत दुहेरी कारनामा करणारा चौथा भारतीय अष्टपैलू खेळाडू बनला आहे. ओवल कसोटीच्या शेवटच्या दिवशी हासिब हमिद आणि मोईन अलीला बाद करत जडेजाने हा पराक्रम केला.

जडेजाने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत ५१ विकेटस् आणि ६७२ धावा केल्या आहेत. जडेजा आधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव ,वीनू मांकड आणि रविचंद्रन अश्विन यांनीही दुहेरी कमाल केली आहे. माजी कर्णधार कपिल देव यांनी ८५ विकेटस् घेत १३५५ धावा केल्या आहेत तर वीनू मांकड ५४ विकेटस् घेत ६१८ धावा केल्यात, रविचंद्रन अश्विनने इंग्लंड विरुद्ध ८८ विकेटस् घेत ९७० धावा केल्या.

- Advertisement -

रवींद्र जडेजाने ओवल कसोटीत भारताच्या विजयासाठी महत्वाचे योगदान दिले. त्याने जसप्रित बुमराह, उमेश यादव आणि शार्दुल ठाकुर सोबत मिळून इंग्लंड संघाला २१० धावांवर धुळ चारत भारताने १५७ धावांनी विजय मिळविला आणि पाच कसोटी मालिकांच्या सामन्यात भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात जडेजाने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजाने चार सामन्यात २२.८५ च्या सरासरीने १६० धावा करत सहा विकेटस् आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय

चौथ्या कसोटीत भारता पहिल्या डावात १९१ धावांवर बाद झाल्यानंतर दमदार पुनरागमन केले. इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा केल्यावर ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात सलामीवीर हसीब हमीद (63) आणि रोरी बर्न्स (५०) यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावा जोडून इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. पण ही जोडी तुटल्यानंतर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. या दोघांशिवाय केवळ फॉर्ममध्ये असलेला कर्णधार जो रूट (36) धावांचा टप्पा पार करू शकला.

- Advertisement -

भारताने नॉटिंगहॅममधील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर लॉर्ड्सवर दुसरी कसोटी जिंकली, तर इंग्लंडने हेडिंग्ले येथे तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली. पाचवी आणि शेवटची कसोटी १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये खेळली जाईल.


हेही वाचा : T20 WORLD CUP : शोएब अख्तरचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -