घरक्रीडाकसोटी सामन्यात रवींद्र जडेजाचा मोठा विक्रम, कपिल देवसह दिग्गज क्रिकेटपटूंना टाकलं मागे

कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाचा मोठा विक्रम, कपिल देवसह दिग्गज क्रिकेटपटूंना टाकलं मागे

Subscribe

दिल्लीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे. कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु या कसोटीच्या सामन्यात ऑलराउंडर रविंद्र जडेजाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या विक्रमात दिग्गज ऑलराऊंडर कपिल देव आणि इम्रान खान यांना मागे टाकले आहे.

रविंद्र जडेजाने पहिल्या डावातील दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला ८१ धावांवर बाद केले. जडेजाने ख्वाजाला बाद करताच त्याच्या नावावर मोठा विक्रम झाला. ख्वाजा हा जडेजाचा कसोटी क्रिकेटमधील २५० वा बळी ठरला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद २५०० धावा आणि २५० बळी घेणारा आशियाई खेळाडू ठरला आहे.

- Advertisement -

जडेजाने ६२ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. तर इम्रान खानने ६४ आणि कपिल देवने ६५ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. गंभीर दुखापतीतून सावरल्यानंतर रवींद्र जडेजाने मैदानावर दमदार पुनरागमन केले आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात जडेजाने आतापर्यंत ५४ धावांत ३ बळी घेतले आहेत. त्यामुळे जडेजाने चकमदार कामगिरी केली आहे.


हेही वाचा : viral video: खेळाडूंना भेटण्यासाठी चाहता मैदानात, सुरक्षारक्षकांकडून मारहाण अन् शमीने केली मध्यस्थी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -