घरक्रीडाआयपीएस अधिकारी झाले 'आयर्नमॅन'

आयपीएस अधिकारी झाले ‘आयर्नमॅन’

Subscribe

फ्रान्सच्या विची शहरात पार पाडलेल्या 'आयर्नमॅन ट्रायथलॉन २०१८' या स्पर्धेत नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र कुमार सिंघल यांनी बाजी मारत आयर्नमॅन हा किताब पटकावला आहे.

आयर्नमॅन एक काल्पनिक सुपरहिरो तसेच एखाद्या ताकदवर-बलवान पुरूषालाही आयर्नमॅन म्हणून संबोधले जाते. याच कल्पनेला अनुसरून आयर्नमॅन ट्रायथलॉन अशी एक स्पर्धा घेतली जाते. ज्यात खेळाडूला पोहणे, सायकलिंग आणि धावणे यासारख्या स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षीची ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन २०१८’ ही स्पर्धा फ्रान्सच्या विची शहरात नुकतीच पार पडली. यात नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांनी ही स्पर्धा पूर्ण करत आयर्नमॅन हा किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे ५० वर्षावरील गटात असा पराक्रम करणारे ते पहिले भारतीय आयपीएस ठरले आहेत.

अशी पार पडते स्पर्धा

वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या आयर्नमॅन ट्रायथलॉन या स्पर्धेत ३.८६ किलोमीटर पोहणे, १८०.२५ किमी. सायकलिंग आणि ४२.२० किमी. धावणे अशा आव्हानांना सामोर जावे लागते. त्यात हे पूर्ण करायला केवळ १६ तास दिले जातात. यावर्षीच्या स्पर्धेत ५३ वर्षीय डॉ.सिंघल यांनी पोहायला १ तास ५० मिनिटे आणि १७ सेकंद, धावायला ५ तास ४५ मिनिटे तर सायकलिंगसाठी ७ तास १२ मिनिटे घेत संपूर्ण स्पर्धा १५ तास १३ मिनिटात संपवत विजय मिळवला आहे.

- Advertisement -

मुंबई पोलीस दलातही ‘आयर्नमॅन’

मागील वर्षीही भारताच्या पोलीस दलातील अधिकाऱ्यानेच हा किताब पटकावला होता. मुंबईचे आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनीही ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन २०१७’ स्पर्धेत विजय मिळवला होता. कृष्णप्रकाश यांनी संपूर्ण आयर्नमॅन स्पर्धा अवघ्या १४ तास ८ मिनीटांत पार पाडत विजय मिळवला होता. मॉडेल मिलींद सोमन नंतर हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय ठरले होते.

ips krishnaprakash iron man
आयपीएस कृष्णप्रकाश (आयर्नमॅन)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -