घरक्रीडाIPL 2022: खराब कामगिरी पण तरीही विराट कोहलीने रचला 'हा' नवा विक्रम

IPL 2022: खराब कामगिरी पण तरीही विराट कोहलीने रचला ‘हा’ नवा विक्रम

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात अनेक खेळाडू विक्रमांना गवसणी घालताना पाहायला मिळत आहेत. नुकताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली याने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात अनेक खेळाडू विक्रमांना गवसणी घालताना पाहायला मिळत आहेत. नुकताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली याने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. यंदाच्या पर्वात विराटच्या रन मशीनचे डक मशीनमध्ये रुपांतर झाले असले, तरी आयपीएलमध्ये 6500 धावांपर्यंत मजल मारणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहली यंदाच्या पर्वात विराट तीन वेळा गोल्डन डकवर बाद झालेला आहे.

आयपीएलच्या 15व्या पर्वातील 60 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज याच्यात झाला. या सामन्यात विराट कोहली खास खेळी करु शकला नाही. त्याने १४ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. मात्र या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये ६५०० धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. ही धावसंख्या गाठण्यासाठी त्याला फक्त एका धावेची गरज होती. हरप्रीत ब्रारने टाकलेल्या चेंडूवर फटका मारताच त्याने ६५०० धावांचा टप्पा ओलांडला.

- Advertisement -

विराट कोहलीनंतर ६००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये सध्या पंजाब किंग्जकडून खेळणारा शिखर धवन हा एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर या रांगेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा डेविड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये ५८७६ धावा केलेल्या आहेत. तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर असून त्याने ५८२९ धावा केल्या आहेत. सध्या अनसोल्ड राहिलेला सुरेश रैना या शर्यतीत पाचव्या स्थानावर असून त्याच्या आयपीएलमध्ये ५५२८ धावा आहेत.


हेही वाचा – ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -