घरIPL 2020RCB vs MI : रोमांचक सामन्यात RCB ची बाजी; सुपरओव्हरमध्ये मुंबईला केलं...

RCB vs MI : रोमांचक सामन्यात RCB ची बाजी; सुपरओव्हरमध्ये मुंबईला केलं पराभूत

Subscribe

दुबईमध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील रंगतदार सामन्यात RCB ने सुपरओव्हरमध्ये मुंबईला पराभूत केलं. मुंबई इंडियन्सने सुपरओव्हरमध्ये ७ धावा करत ८ धावांचं लक्ष्य दिलं. ८ धावांचा पाठलाग करण्यासाठी RCB कडून कोहली आणि डिव्हिलिअर्स मैदानात उतरले. कोहली आणि डिव्हिलिअर्स उत्तम खेळ करत RCB ला सामना जिंकवून दिला.

इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सने बंगळुरुविरुद्ध बरोबरी साधण्यात यश मिळवलं. २० षटकांत मुंबईने ५ गडी गमावत २०१ धावांपर्यंत मजल मारली. इशान किशनच्या ९९ धावा मुंबईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावा हव्या असताना पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे हा सामना सुपरओव्हरमध्ये गेला. आयपीएलच्या तेराव्या हंगामातली ही दुसरी सुपरओव्हर ठरली.

- Advertisement -

दरम्यान, मधल्या फळीत इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने RCB विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. विजयासाठी एका चेंडूत ५ धावांची गरज असताना कायरन पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्याआधी २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी-कॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात मागारी परतले होते. परंतू इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी संयमी खेळ करत शतकी भागीदारी केली आणि सामना रंगतदार अवस्थेत आणला. इशान किशनने ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा केल्या. अवघ्या एका धावाने त्याचं शतक हुकलं. पोलार्डने ६० धावा करत त्याला चांगली साथ दिली.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. RCB च्या समीवारांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. सलामीवीर फिंच, पडीकल यांनी अर्धशतकं झळकावली. फिंच, पडीकल आणि एबी डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर RCB ने मुंबईला २०२ धावांचं लक्ष्य दिलं. फिंच-पडीकल जोडीने आश्वासक सुरुवात करुन संघाची बाजू भक्कम केली. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी RCB च्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात यश मिळवलं. परंतू अखेरीस डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीमुळे RCB ने आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत डिव्हीलियर्सनेही नाबाद ५५ धावांची खेळी केली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने २ तर राहुल चहरने एक बळी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -