घरIPL 2020IND vs AUS : उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसाठी तयार - लोकेश राहुल

IND vs AUS : उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसाठी तयार – लोकेश राहुल

Subscribe

रोहितच्या अनुपस्थितीत राहुलची उपकर्णधारपदी निवड झाली आहे.

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० संघांची घोषणा झाली. प्रमुख फलंदाज रोहित शर्माला तिन्ही संघांमध्ये स्थान मिळाले नाही. पायाच्या दुखापतीमुळे रोहित सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या मागील काही सामन्यांना मुकला आहे. मात्र, त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, याबाबत काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलची एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. राहुलने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पंजाबचे यशस्वीरीत्या नेतृत्व केले आहे. आता तो भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसाठीही तयार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आतुरतेने वाट पाहतोय

माझी भारताच्या उपकर्णधारपदी निवड होईल असे मला अजिबातच वाटले नव्हते. मात्र, माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. मी उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसाठी आणि आव्हानासाठी तयार आहे. आता संघाला मदत व्हावी यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करेन, असे राहुल म्हणाला. मी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, त्याआधीचे दोन-तीन आठवडेही खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी फार पुढचा विचार करणे टाळत आहे, असेही राहुलने सांगितले. राहुल यंदाच्या आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना १२ सामन्यांत ५९५ धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. तसेच कर्णधार म्हणूनही त्याने चांगली कामगिरी केली आहे. पंजाबचा संघ सध्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -