घरक्रीडारियाल माद्रिदची जेतेपदाची हट्ट्रिक गॅरेथ बेलचा बायसिकल गोल

रियाल माद्रिदची जेतेपदाची हट्ट्रिक गॅरेथ बेलचा बायसिकल गोल

Subscribe

दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या रियाल माद्रिदने युरोपियन चषक फुटबॉल स्पर्धेत हट्ट्रिक करण्याचा पराक्रम केला. गॅरेथ बेलचा अप्रतिम बायसिकल गोल हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. बेलने अंतिम सामन्यात दोन गोल मारले असून ६४ व्या मिनिटाला बायसिकल गोल मारत फुटबॉल प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. तसेच ८४ व्या मिनिटाला दूरवरून दुसरा अप्रतिम गोल मारुन लोकांची वाह वाई मिळवली. यामुळे रियाल माद्रिदने लिव्हरपूलला ३-१ असे नमवून सलग तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. या जेतेपदासह रियाल माद्रिदने १३ युरोपियन किताब आपल्या नावावर केला.

Salah crying
सलाहचे अश्रू झाले अनावर

सलाहला रडू कोसळले
पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. २६व्या मिनिटाला मोहम्मद सालाह आणि रियाल माद्रिदचा कर्णधार सर्जियो रेमोस हे एकमेकांना धडकले. यात सलाहच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. अंतिम लढतीत मैदानाबाहेर जावे लागल्याने त्याला रडू कोसळले. २८व्या मिनिटाला तो मैदानात परतला. पण दुसऱ्याच मिनिटाला पुन्हा जायबंदी झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. ३५ व्या मिनिटाला रियाल माद्रिदचा डानी कार्वाहलही जायबंदी झाला आणि त्यालाही मैदानाबाहेर जावे लागले. पहिल्या हाफपर्यंत लिव्हरपूल माद्रिदपेक्षा चांगला खेळ करत होता. पण दुसऱ्या हाफमध्ये माद्रिदच्या खेळाडूंनी अप्रतिम आणि आक्रमक खेळ केला.

- Advertisement -

 

- Advertisement -

माद्रिदने कोरले जेतेपदावर नाव
५१ व्या मिनिटाला माद्रिदच्या करीम बेंजिमाने पहिला गोल डागला. मात्र, थोड्याच वेळात लिव्हरपूल संघानेही गोल डागत बरोबरी साधली. त्यानंतर माद्रिदच्या गॅरेथ बेलने ६४ व्या मिनिटाला एक आणि नंतर ८४व्या मिनिटाला दुसरा गोल डागला. या दोन गोलच्या जोरावर माद्रिदने लिव्हरपूलला ३-१ ने हरवून चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदावर नाव कोरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -