घरक्रीडाneeraj chopra gold medals: ३७ वर्षांनंतर माझं अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं -...

neeraj chopra gold medals: ३७ वर्षांनंतर माझं अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं – पी.टी. उषा

Subscribe

अॅथलेटिक्समधला आज नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास बदलला आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सुवर्णपदाची कमाई केली आहे. भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धांतील केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले (Gold Medal) असून याआधी नेमबाज अभिनव बिंद्राने (२००८) भारताला ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले होते. नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर संपूर्ण भारतात आनंद साजरा करत आहेत. त्याच्या घरी आणि संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. नीरजवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नीरजला शुभेच्छा देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत नीरजला शुभेच्छा देत म्हणाले की, ‘टोकियोमध्ये इतिहास रचला गेला आहे. नीरज चोप्राने आज जी कामगिरी केली आहे, ती नेहमी संस्मरणीय अशी आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी नीरजने केली आहे. नीरच्या संयमांचे, धैर्याचं आणि अतुलनीय प्रदर्शनाचे कौतुक. सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.’

- Advertisement -

तसेच भारताची महान धावपटू पी.टी. उषा यांनी देखील ट्वीट करत नीरजचे अभिनंदन केले आहेत. त्या म्हणाल्या की, ‘माझे अपूर्ण स्वप्न ३७ वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. धन्यवाद, माझ्या मुला.’

- Advertisement -

आज टॉकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलंच सुवर्णपदक जिंकत नीरजने इतिहास रचला आहे. याबाबत माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर म्हणाले की, ‘१३० कोटी भारतीयाचं बळ नीरज चोप्राच्या बाहूत दिसलं.’ तसेच विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘तो रॉकेट आहे, बिलियन्स भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू. तू चॅम्पियन आहेस, या आनंदाबद्दल तुझे आभारी आहोत.’


हेही वाचा – Tokyo Olympics : १०० वर्षांचा दुष्काळ संपला; भालाफेकपटू नीरज चोप्राला ‘सुवर्ण’


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -