घरIPL 2020IPL 2020: म्हणून वरुण चक्रवर्तीने आर्किटेक्ट सोडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली

IPL 2020: म्हणून वरुण चक्रवर्तीने आर्किटेक्ट सोडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली

Subscribe

कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणा, सुनिल नरीन आणि ऑफ स्पिनर वरुण चक्रवर्ती यांच्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव केला. या सामन्यात नितीश राणाने ५३ चेंडूत ८१ धावा केल्या तर, सुनिल नरिनने ३२ चेंडूत ६४ धावा केल्या. या दोन फलंदाजां व्यतिरिक्त फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने अचूक गोलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

या सामन्यात चक्रवर्तीने २० धावा देऊन ५ गडी बाद केले. वरुण चक्रवर्तीची आतापर्यंतची चांगली कामगिरी आहे. सामन्यानंतर त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रेझंटेशन दरम्यान, आर्किटेक्ट सोडून क्रिकेट का सुरु केलं याचा खुलासा केला. आर्किटेक्टचं काम करताना किती कष्ट सहन केले याची माहिती दिली. मी आर्किटेक्ट असताना जास्त पैसे कमवत नव्हतो. माझ्या गरजा मला पूर्म करता येत नव्हत्या. तेव्हा मी विचार केला की, जर मला माझ्या गरजा मला पूर्ण करता येत नसतील तर मला काही तरी वेगळं करावं लागेल. त्यानंतर मी क्रिकेटला सुरुवात केली, असं वरुण चक्रवर्तीने सांगितलं. यावेळी त्याने त्याची आई हेमा मालिनी, वडील विनोथ चक्रवर्ती आणि पत्नी नेहा चक्रवर्तीचे आभार मानले. पुढे बोलताना म्हणाला की, हे सत्य आहे की, मला मागील काही सामन्यात विकेट्स मिळाले नाहीत. पण या सामन्यात मला एक-दोन विकेट घ्यायचे होते आणि देवाच्या कृपेने ५ विकेट घेतले. मी श्रेयस अय्यरच्या विकेटचा सर्वाधिक आनंद घेतला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -