विराटचा कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय योग्य, रिकी पाँटिंगचे मत

विराट कोहली आता ३३ वर्षांचा आहे त्यामुळे तो आणखी खेळू इच्छितो. विराट कोहली फलंदाजीमध्ये अनेक विक्रम बनवेल ज्यापासून तो फार दूर नाही. कर्णधारापदाची जबाबदारी न घेता फलंदाज म्हणून विराटसाठी खेळण सोपे जाऊ शकते असेही रिकी पाँटिंग म्हणाला.

ricky ponting said virat kohli success as team India test captain
विराटचा कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय योग्य, रिकी पाँटिंगचे मत

टीम इंडियाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू विराट कोहलीने कसोटी सामन्याच्या फॉर्मेटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन खेळाडूंमध्ये चर्चा सुरु आहे. काही खेळाडूंनी विराटच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे तर काही खेळाडू त्याच्या निर्णयाविरोधात मत नोंदवत आहेत. विराट कोहलीचा कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय योग्य असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला रिकी पाँटिंग याने म्हटलं आहे. विराट कोहलीने फलंदाजीमध्ये विक्रम रचण्यास आणि विक्रम मोडीत काढण्यासाठीच्या उद्देशाने निर्णय घेतला असावा असे रिकी पाँटिंग म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने एका मुलाखतीमध्ये विराट कोहलीच्या निर्णयाचे समर्थन केलं आहे. विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयामुळे मी आश्चर्यचकित झालो आहे, परंतु तो पुढे म्हणाला की भारतीय फलंदाजांसाठी हा एक चांगला निर्णय ठरू शकतो. फलंदाजीत चांगली कामगिरी करून काही विक्रम मोडीत काढण्याच्या उद्देशाने त्याने हा निर्णय घेतला असावा, असे रिकी पाँटिंगचे मत आहे. तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने अनेक विक्रम केले आहेत. त्यानी परदेशी भूमीवर पूर्वीपेक्षा जास्त सामने जिंकले आहेत अशा शब्दांत कोहलीचे पाँटिंगने कौतुक केलं आहे. विराट कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून रोहित शर्मा ही भूमिका चोख बजावेल असे देखील रिकी पाँटिंग म्हणाला आहे.

दरम्यान रिकी पाँटिंगने पुढे म्हटलं आहे की, हो मला खरंच वाटलं, आयपीएलच्या पहिल्या फेरीत विराट कोहलीसोबत चर्चा केली होती. त्यावेळी त्याने मर्यादित षटकांचे कर्णाधारपद सोडण्याविषयी बोलत होता. कसोटी सामन्याचे कर्णधारपद कर्यासाठी तो उत्कट होता. त्याला हे काम खूप आवडले आणि त्याने त्याच आनंदही घेतला. त्याच्याबाबत जेव्हा मी ऐकले तेव्हा मला आश्चर्य वाटले परंतु कोहलीने हा निर्णय घेण्यापूर्वी खूप गोष्टींचा विचार केला असेल असे रिकी पाँटिंगने म्हटलं आहे.

विराट कोहली एकूण सात वर्ष कर्णधार होता. जगात असा कोणता देश असेल की ज्या संघाचे कर्णधारपद हे सर्वात कठीण काम आहे. तर तो भारत आहे. कारण भारतात प्रत्येक खेळ लोकप्रिय आहे. प्रत्येक भारतीयाला आपला संघ जिंकलेला पाहायचा असतो. विराट कोहली आता ३३ वर्षांचा आहे त्यामुळे तो आणखी खेळू इच्छितो. विराट कोहली फलंदाजीमध्ये अनेक विक्रम बनवेल ज्यापासून तो फार दूर नाही. कर्णधारापदाची जबाबदारी न घेता फलंदाज म्हणून विराटसाठी खेळण सोपे जाऊ शकते असेही रिकी पाँटिंग म्हणाला.


हेही वाचा : IND vs WI : इंग्लंडला धूळ चारण्यासाठी कॅरेबियाईच्या निशाण्यावर टीम इंडिया, पाहा वेळापत्रक