घरक्राइममाणुसकीला काळिमा! ऋषभ पंत रक्ताच्या थारोळ्यात ओरडतोय, पण लोक पैसे गोळा करतायत

माणुसकीला काळिमा! ऋषभ पंत रक्ताच्या थारोळ्यात ओरडतोय, पण लोक पैसे गोळा करतायत

Subscribe

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला. शुक्रवारी पहाटे रुरकीच्या नरसनमध्ये हा अपघात झाला. ज्यात त्याच्या कारचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर ऋषभने पेडत्या कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र जब्बर मार लागल्याने त्याला कारमधून बाहेर पडता येत नव्हते, मात्र कसतरी करून त्याने अपघातग्रस्त कारमधून स्वत:ची सुटका करून घेतली. यावेळी ऋषभ पंत रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात मदतीसाठी याचना करत होता. मात्र यावेळी माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली.

ऋषभच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये होते. मात्र कारच्या अपघातानंतर सर्व रक्कम रस्त्यावर विखुरली गेली. यावेळी रक्ताने माखलेल्या अवस्थेत ऋषभ पंत मदतीसाठी लोकांकडे याचना करत होता. मात्र काही लोक ऋषभच्या मदतीसाठी आले पण, ते मदत करण्याऐवजी त्याच्या कारमधून पडलेल्या नोटा खिशात भरण्यात आणि व्हिडीओ काढण्यात मग्न होते. या निर्दयी घटनेचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

त्याचवेळी दोन तरुण ऋषभच्या मदतीसाठी मसिहा बनून पुढे आले. ज्यांनी ऋषभला रुरकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल केले. यातील एका तरुणाचे नाव रजत असून तो घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या लिबरहेरी येथील उत्तम साखर कारखान्यात काम करतो. रजत त्याच्या गावातील निशू आणि ओम कुमार या इतर दोन सहकाऱ्यांसोबत दुचाकीवरून सकाळच्या शिफ्टमध्ये कामावर जात होते. याचवेळी ऋषभ पंतच्या गाडीचा अपघात झाला, अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतला त्याने ओळखले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

यावर डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, ऋषभला रुग्णालयात आणले असता दोन तरुण त्याच्यासोबत होते. त्यांनी ऋषभला योग्यवेळी हॉस्पीटलमध्ये आणले. भरतीदरम्यान ऋषभ पंतची प्रकृती थोडी गंभीर होती, पण जसजसा वेळ निघून गेला तसतशी प्रकृती सुधारू लागली आहे. यानंतर ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ पंतची प्लॅस्टिक सर्जरीही येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


वांद्रेमधील माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; लष्कर-ए-तोय्यबाकडून पोलिसांना ईमेल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -