घरक्रीडाRishabh Pant Century: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ऋषभ पंतची फटकेबाजी, शानदार शतकासह मोडला धोनीचा...

Rishabh Pant Century: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ऋषभ पंतची फटकेबाजी, शानदार शतकासह मोडला धोनीचा रेकॉर्ड

Subscribe

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने शानदार शतक झळकावलं आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव १९७ धावांवर संपुष्टात आला आहे. ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सवर काऊंटर अटॅक करत १०० धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

ऋषभ पंतचा कारकिर्दीतील चौथा शतक

ऋषभ पंतचा कसोटी मालिकेच्या कारकिर्दीतील हा चौथा शतक आहे. केवळ १३९ बॉलवर त्याने नाबाद १०० धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचं टार्गेट देण्यात आलंय. केपटाऊनच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी ऋषभने ४ षट्कार, ६ चौकार लगावले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर पंत अक्षरश: भारी पडला आहे. पंतचा सध्याचा स्ट्राईक रेट ७० च्यावर आहे.

- Advertisement -

द. आफ्रिकेविरूद्ध विकेटकीपरच्या सर्वाधिक धावा

ऋषभ पंत – १०० धावा

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनी – ९० धावा

दीप दासगुप्ता – ६३ धावा

टीम इंडियाचा दुसरा डाव १९७ धावांवर गडगडला असून फक्त ऋषभ पंतने १०० धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच तो नाबाद राहिलाय. पंतनंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघात सर्वाधिक धावा काढल्या. कोहलीसोबत पंतने ९४ धावांची भागिदारी केली. दोघांनीही भारताचा डाव सावरत धावसंख्या १५० च्या पुढे नेली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंतची कामगिरी खराब दिसत होती. परंतु भारताचे प्रशिक्षक आणि विराट कोहलीने पंतवर विश्वास ठेवला. त्यानंतर दुसऱ्या डावात पंतने धडाकेबाज कामगिरी करत १०० धावा पूर्ण केल्या आणि नाबाद राहीला.


हेही वाचा : डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती, परीक्षा फीच्या सवलतीबाबत अर्ज करण्यास मुदतवाढ – धनंजय मुंडे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -