Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाRishabh Pant : पंत आयपीएलच्या इतिहासतला सर्वात महागडा खेळाडू; श्रेयसची संधी 25...

Rishabh Pant : पंत आयपीएलच्या इतिहासतला सर्वात महागडा खेळाडू; श्रेयसची संधी 25 लाखाने हुकली

Subscribe

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासतला सर्वात महाग खेळाडू बनला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा मेगा लिलाव आज, रविवार (24 नोव्हेंबर) आणि उद्या, सोमवार (25 नोव्हेंबर) रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होत आहे. या लिलावात तब्बल 577 खेळाडूंवर बोली लावली जात असून, त्यापैकी जास्तीत जास्त 204 खेळाडूंची विक्री होणार आहे. विशेष म्हणजे आजच्या बोलीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासतला सर्वात महाग खेळाडू बनला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. (Rishabh Pant is the most expensive player in IPL history while Shreyas Iyer is second)

ऋषभ पंतवर बोली लागण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याला विकत घेण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु यांच्यात चढाओढ होताना दिसली. ऋषभ पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता, मात्र काही वेळातच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेली. पंतची किंमत वाढत असल्याने सनरायझर्स हैदराबादही त्याला विकत घेण्यासाठी शर्यतीत सामील झाला. पण लखनऊ सुपर जायंट्सने हार मारली नाही.

- Advertisement -

हैदराबादचे मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत 17 कोटींच्या पुढे गेली. हैदराबाद आणि लखनऊ इथेच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली. लखनऊने पंतसाठी 20.75 कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे हैदराबादने माघार घेतली. अशावेळी दिल्लीने आरटीएमचा वापर केला म्हणजे ऋषभ पंत त्यांच्या संघाचा खेळाडू असल्याने त्यांनी त्याच्यावर पुन्हा दावा केला. मात्र लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने माघार घेतली. अशाप्रकारे पंत 27 कोटी रुपये घेत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला.

हेही वाचा – IND vs AUS Test : पहिल्या डावात फेल, पण दुसऱ्या डावात धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाची दैना 

- Advertisement -

श्रेयसने मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरसाठी बोली लागण्यास सुरुवात झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सने त्याला विकत घेण्यासाठी बराच काळ स्पर्धा केली. अखेर पंजाब किंग्सने त्याला 26 कोटी 75 लाखांना विकत घेतले. ऋषभ पंतमुळे श्रेयसची महागडा खेळाडू बनण्याची संधी थोडक्यात हुकली, मात्र त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला आहे. कोलकाता नाइट राइडर्स संघाने मागील लिलावावेळी त्याला 24 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले होते. दरम्यान, यंदाच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने स्टार्कसाठी 11 कोटी 75 लाखांची बोली लावली.

मेगा ऑक्शनमध्येही या खेळाडूंनाही कोटींची बोली

  1. फलंदाज
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने 6 कोटी 25 लाखांना विकत घेतले.
    लखनऊ सुपर जायंट्स संघाने एडन मार्करामला त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 2 कोटी रुपयांना विकत घेतले.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या डेव्हॉन कॉनवेला चेन्नई सुपर किंग्सने 6 कोटी 25 लाखांना विकत घेतले.
    मूळ 75 लाख रुपये किंमत असलेल्या राहुल त्रिपाठीला चेन्नई सुपर किंग्सने 3 कोटी 40 लाखांना विकत घेतले.
  2. वेगवान गोलंदाज
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज हेजलवुडला रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु 12 कोटी 50 लाखांना विकत घेतले.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाला गुजरात टायटन्सने 9 कोटी 50 लाखांना विकत घेतले.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या आवेश खानला लखनऊ सुपरजायंट्सने 9 कोटी 75 लाखांना विकत घेतले.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्टजेला 6 कोटी 50 लाखांना विकत घेतले.
  3. विकेटकीपर फलंदाज
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक कोलकाता नाइट रायडर्सने 3 कोटी 60 लाखांना विकत घतेले. लखनऊ सुपर जायंट्सने आरटीएम कार्ड उपलब्ध होते, परंतु त्यांनी ते डी कॉकसाठी वापरले नाही.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या इंग्लंड संघाच्या फिल सॉल्टला रॉयल चैलेंजर्स बेंगळुरुने 11 कोटी 50 लाखांना विकत घेतले.
    अफगाणिस्तान संघाचा रहमानउल्ला गुरबाजला कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्याच्या मूळ किमतीत म्हणजे 2 कोटींना विकत घेतले.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या ईशान किशनला सनरायझर्स हैदराबाद संघाने 11  कोटी 25 लाखांना विकत घेतले.
    मूळ 1 कोटी रुपये किंमत असलेल्या जितेश शर्मासाठी रॉयल चैलेंजर्स संघाने 7 कोटींची बोली लावली. यावेळी पंजाब किंग्जने जितेशसाठी आरटीएम वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉयल चैलेंजर्स संघाने जितेशसाठी 11 कोटी रुपयांची अंतिम बोली लावली, पण पंजाबने ती स्वीकारली नाही. असे असले तरी 11 कोटी रुपयांत जितेश शर्मा रॉयल चैलेंजर्सच्या ताफ्यात सामील झाला.
  4. अष्टपैलू खेळाडू
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या हर्षल पटेलवर सनरायझर्स हैदराबाद संघाने 6 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली. पण पंजाबने आरटीएम कार्ड वापरण्याचा निर्णय घेतला. अशावेळी हैदराबादने 8 कोटी रुपयांची ऑफर दिली आणि पंजाब किंग्सने बोलीतून माघार घेतली. अशा प्रकारे हर्षल पटेल 8 कोटी रुपये घेत सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात सामील झाला.
    पंजाब किंग्जने रचिन रवींद्रसाठी 3.20 कोटींची बोली लावली. अशावेळी चेन्नई सुपर किंग्सने आरटीएम कार्डचा वापर केला, त्यामुळे पंजाबने 4 कोटी रुपयांची ऑफर दिली. यानंतर चेन्नईनेही बरोबरी साधली. त्यामुळे 4 कोटी रुपयात रचिन रवींद्र चेन्नईच्या संघात सामील झाला.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या रविचंद्रन अश्विनला चेन्नईने 9 कोटी 75 लाखांना विकत घेतले.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या व्यंकटेश अय्यरला कोलकाता संघाने 23 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या मार्कस स्टॉइनिसला पंजाब किंग्सने 11 कोटी रुपयांना विकत घेतले.
    लखनऊ सुपर जायंट्स संघाने मिचेल मार्शला 3 कोटी 40 लाखांना विकत घेतले.
    मूळ 2 कोटी रुपये किंमत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला पंजाब किंग्सने 4 कोटी 20 लाखांना विकत घेतले.

हेही वाचा – IND vs AUS Test : यशस्वी जैस्वालची कामगिरी अन् केले हे विक्रम; वाचा सविस्तर


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -