घरक्रीडाऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; आठ ते नऊ महिने खेळ नाही

ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; आठ ते नऊ महिने खेळ नाही

Subscribe

ऋषभ पंतला पुन्हा मैदानावर येण्यासाठी किमान आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या वर्षी होणारे आयपीएल सामने, आशिया कप व एक दिवसिय क्रिकेट सामाने ऋषभला खेळता येणार नाहीत. ऋषभच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शुक्रवारी ही शस्त्रक्रिया झाली.

मुंबईः क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्यावर अजून एक शस्त्रक्रिया होणार आहे, असे अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

ऋषभ पंतला पुन्हा मैदानावर येण्यासाठी किमान आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या वर्षी होणारे आयपीएल सामने, आशिया कप व एक दिवसिय क्रिकेट सामाने ऋषभला खेळता येणार नाहीत. ऋषभच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शुक्रवारी ही शस्त्रक्रिया झाली. सुमारे दोन तास या शस्त्रक्रियेला लागले. शस्त्रक्रियेनंतर त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभची अजून एक शस्त्रक्रिया होणार आहे. डॉ. दिनेश पारदीवाला व बीसीसीआयचे वैद्यकीय पथक ऋषभच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असे बीसीसीआयने सांगितले.

- Advertisement -

ऋषभ पंत नववर्षाच्या निमित्ताने आईला भेटण्यासाठी दिल्ली येथून देहरादूनला जात होता. त्यावेळी गुरुकुल नरसन परिसरात त्याच्या कारला अपघात घडला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केले. कार चालवताना पंतला डुलकी लागल्याने हा अपघात झाला, असा प्राथमिक अंदाच वर्तवण्यात आला होता.

अपघातानंतर कारला आग लागल्याने बाहेर पडण्यासाठी पंतला काच फोडावी लागली. कारमध्ये पंत एकटाच होता.  ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी मार लागला. त्याच्या उजव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली. त्याच्या उजव्या मनगटाला, घोटाला, पायाच्या बोटांना दुखापत झाली. त्याच्या पाठीला मोठ्या प्रमाणावर खऱचटले. शरीरावर अनेक जखमा झाल्या. डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये पंतवर उपचार सुरू होते. पंतचा अपघात गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी दिल्ली आणावे का, याची चाचपणी सुरु होती. त्याला एअर लिफ्ट करावे का, याचाही अंदाज घेण्यात आला होता. मात्र नंतर ऋषभला उपचारासाठी मुंबईत आणण्यात आले. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरु आहेत. त्याच्यावर शुक्रवारी एक शस्त्रक्रिया झाली आहे. खड्डा वाचवताना ऋषभच्या कारला अपघात झाल्याचे कारण नंतर पुढे आले. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा पुन्हा चर्चेत आला.

- Advertisement -

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -