Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) अपघातानंतर मागील काही दिवसांपासून मैदानाबाहेर आहे. तो त्यांच्या तब्येतील होत असलेल्या सुधारणेबद्दल सातत्याने अपडेट्स देत असतो. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या जगभरातील चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर परतला असून मोठे फटके मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत एका सामन्यात फलंदाजी करताना दिसत आहे. (Rishabh Pant returns to the field after the accident Everyone was shocked by hitting big shots)
हेही वाचा – Asia Cup 2023 : भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाने केली निवृत्ती जाहीर
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत मैदानावर फलंदाजीसाठी येताना दिसत आहे. त्याने पहिल्याच चेंडूवर फ्रंट फूटवर ड्राईव्ह खेळताना दिसत आहे. त्यानंतर त्याने दुसरा चेंडू कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र त्याला ते शक्य होत नाही. परंतु तिसऱ्याच चेंडूवर ऋषभ पंत पुढे सरकतो आणि मोठा फटका मारतो. हा फटका पाहून तिथे उपस्थित क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला आहे.
@RishabhPant17 back in the ground 😍😍 #rishabhpant pic.twitter.com/M0r1tq9tzl
— Md Israque Ahamed (@IsraqueAhamed) August 16, 2023
ऋषभ पंत मोठे फटके मारताना दिसला, मात्र त्याने धावा घेतल्या की नाही हे समजू शकलेले नाही. या व्हिडीओनंतर चाहत्यांनी एकदिवसीय विश्वचषक ऋषभ पंत परतेल, असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओनुसार हा सामना जेएसडब्ल्यू विजयनगर येथे खेळवला जात होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला. व्हिडीओ बघणाऱ्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा – ODI World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टार खेळाडूची निवृत्तीनंतर पुन्हा एन्ट्री
अपघातानंतर ऋषभ पंत मैदानापासून होत दूर
30 डिसेंबर रोजी दिल्लीहून उत्तराखंडला जात असताना ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. त्यावेळी तो कारमध्ये एकटाच होता. त्याला आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पंतची तब्येत सध्या सुधारत असून तो आता क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात ऋषभ पंत भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दिसण्याची शक्यात आहे.