‘या’ 24 वर्षीय खेळाडूला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार करण्याची युवराज सिंहने केली मागणी

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यानंतर भारतीय संघाची धुरा हिट-मॅन रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. मात्र, मर्यादीत षटकांसाठी रोहित शर्मा कर्णधार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असणार यावर क्रिकेटविश्वात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

ex cricketer yuvraj singh become father share information on twitter
Yuvraj singh : युवराज सिंहच्या घरी चिमुकल्याचे आगमन

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यानंतर भारतीय संघाची धुरा हिट-मॅन रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. मात्र, मर्यादीत षटकांसाठी रोहित शर्मा कर्णधार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असणार यावर क्रिकेटविश्वात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच आता भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने २४ वर्षीय क्रिकेटर ऋषभ पंत याच्या नावाचं समर्थन केलं आहे. युवराजने ऋषभ पंत याला कसोटी संघाचा उपकर्णधार करण्याची मागणी केली आहे.

“ऋषभ पंत याला कसोटी संघाचा उपकर्णधार करा. जेणेकरुन तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्याने यावेळी धोनीचं उदाहरण देखील दिलं असून सध्या या जबाबदारीसाठी पंत योग्य खेळाडू आहे. महेंद्र सिंह धोनी एक उत्तम कर्णधार होता. कारण एक विकेटकीपर संपूर्ण खेळाला योग्यरितीने समजू शकतो. त्याच्या मते सिलेक्टर्सनी देखील पंतला भविष्यासाठी तयार करायला हवं. तो युवा खेळाडू असून एक उत्तम कर्णधार बनू शकतो. त्यात विकेटकिपर असल्याने त्याचं लक्ष संपूर्ण मैदानावर असेल ज्याचा त्याला आणि संघाला फायदा होईल”, असं युवराज सिंह म्हणाला.

यावेळी युवराजने पंतची तुलना ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक गिलख्रिस्टसोबत केली. गिलीने सात नंबरवर फलंदाजी करत 17 शतकं ठोकली. त्यात पंतनेही आतापर्यंत 4 दमदार शतकं ठोकल्याचं त्याने सांगितले. तसंच, त्याने विराट कोहलीली जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली होती. तेव्हा तो ही इतकाच परिपक्व होता. त्यामुळे पंतलाही जबाबदारी दिली जाऊ शकते.


हेही वाचा – IPL 2022: आयपीएलमधील ‘हे’ दोन गोलंदाज भारतीय संघात करू शकतात पदार्पण