घरक्रीडाIND vs ENG : पंतची महान खेळाडूंमध्ये गणना होईल; गांगुलीने केली स्तुती  

IND vs ENG : पंतची महान खेळाडूंमध्ये गणना होईल; गांगुलीने केली स्तुती  

Subscribe

पंतने ११८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली.

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावले. त्याने ११८ चेंडूत केलेल्या १०१ धावांच्या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली. भारतीय संघ ६ बाद १४६ असा अडचणीत सापडला होता. परंतु, पंतने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने शतकी भागीदारी रचत भारताला सावरले. पंत सध्या चांगल्या फॉर्मात असून त्याने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्यामुळे बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ट्विटरच्या माध्यमातून पंतची स्तुती केली.

अविश्वसनीय खेळी केली

पंत फारच उत्कृष्ट खेळाडू आहे. भारतीय संघ अडचणीत असल्याने त्याच्यावर दडपण होते. मात्र, त्याने अविश्वसनीय खेळी केली. इतकी अप्रतिम खेळी त्याने पहिल्यांदा केली नसून यापुढेही तो अशी दमदार कामगिरी करत राहील. पुढील अनेक वर्षे तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत चांगला खेळ करेल आणि त्याची महान खेळाडूंमध्ये गणना होईलयाची मला खात्री आहे. आक्रमक शैलीत फलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळेच तो मॅचविनर आहे, असे गांगुलीने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -