घरक्रीडाIPL 2022: ऋषी धवनचे तब्बल ६ वर्षांनी पुनरागमन; पण चेहऱ्यावरच्या फेस शिल्डची...

IPL 2022: ऋषी धवनचे तब्बल ६ वर्षांनी पुनरागमन; पण चेहऱ्यावरच्या फेस शिल्डची जोरदार चर्चा

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील कालचा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात खेळाडूंची तुफानी खेळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या सामन्यात पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन याने तब्बल 6 वर्षांनी दमदार कमबॅक केले आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील कालचा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात खेळाडूंची तुफानी खेळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या सामन्यात पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन याने तब्बल 6 वर्षांनी दमदार कमबॅक केले आहे. मात्र पुनरागमन केल्यावर मैदानात खेळताना ऋषी धवनने चेहऱ्यावर फेस शिल्ड लावली होती. त्यामुळं त्याच्या पुनरागमनासोबतच त्याच्या फेस शिल्डची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

चेहऱ्यावर फेस शिल्ड लावण्याचे कारण स्वत: ऋषी धवनने दिले आहे. आयपीएल सामने सुरु होण्यापूर्वी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता. यावेळी सामन्यादरम्यान त्याच्या चेहऱ्याला लागले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच कारणामुळे आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो पंजाब किंग्जच्या संघामध्ये दिसला नाही. ऋषी धवनवर नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे चेंडू लागू नये किंवा इतर कसलीही इजा होऊ नये म्हणून त्याने फेस शिल्ड लावली होती.

- Advertisement -

ऋषी धवनने तब्बल 6 वर्षांनंतर पदार्पण केले आहे. याआधी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेला आहे. मात्र २०१६ नंतर तो आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत आहे. २०१६ साली त्याने पंजाब किंग्जकडूनच फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. ऋषीला फलंदाजी करण्याची संधी भेटली नसली तरी गोलंदाजीमध्ये त्याने दुसऱ्याच षटकात शिवम दुबेचा त्रिफळा उडवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

दरम्यान, पुन्हा एकदा ऋषी धवनने पंजाबसाठी खेळण्यास सुरुवात केली. या सामन्यात त्याने टाकलेल्या दुसऱ्याच षटकात चेन्नईचा शिवम दुबे त्रिफळाचित झाला. त्याने घेतलेल्या या बळीची चांगलीच चर्चा झाली. पदार्पणातच विकेट घेतल्यामुळे त्याची वाहवा होत आहे. ऋषी धवनने त्याच्या पहिल्याच सामन्यात भेदर मारा करत गोलंदाजी केली. या संपूर्ण सामन्यात त्याने चेहऱ्यावर फेस शिल्ड लावली होती. मैदानावर चपळाईने वावरणाऱ्या ऋषीने चेहऱ्यावर काय लावले ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022: गब्बर धवनची तुफानी खेळी; एकाच सामन्यात रचले 2 विक्रम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -