घरक्रीडाऋतुराज, ब्रावोच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विजय; धोनीकडून खेळाडूंना श्रेय

ऋतुराज, ब्रावोच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विजय; धोनीकडून खेळाडूंना श्रेय

Subscribe

ऋतुराज आणि ब्राव्होने आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगल्या गुणांवर नेले.

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर २० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघातील सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि ड्वेन ब्राव्होने वादळी खेळी केली आहे. ऋतुराजच्या नाबाद अर्धशतकामुळे आणि ड्वेन ब्राव्होच्या उत्कृष्ट खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला आहे. या विजयाचे श्रेय संघाचा कर्णधार एम एस धोनीने दोन्ही फलंदाजांना दिलं आहे. चेन्नई संघाची सध्या बिकट अवस्था असतानाही ऋतुराज, ब्रावोच्या उत्कृष्ठ खेळीमुळे अपेक्षेपेक्षाही जास्त धावा करुन संघाला विजयी केलं असल्याचे धोनीने म्हटलं आहे.

धोनीकडून खेळाडूंना श्रेय

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर धोनीने म्हटलं आहे की, संघ बिकट परिस्थितीत असताना खेळाडू ऋतुराजने डाव सावरला आहे. ऋतुराज खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर चांगली कामगिरी करत धावा काढल्या यानंतर ब्राव्होने ऋतुराजला चांगली साथ दिली आणि दोघंनीही आक्रमक खेळी करुन संघाला अधिक धावा मिळवून दिल्या आहेत. यामुळे आम्ही धावा उभारण्यात यशस्वी झालो आहोत. या दोन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नसती तर आम्हाला मुंबईचा सामना करणं शक्य झाले नसते असे धोनीने म्हटलं आहे.

- Advertisement -

चेन्नई सुपर किंग्जच्या १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दीपक चहर यांच्या धारदार गोलंदाजीसमोर मुंबई इंडियन्स ८ बाद १३६ धावाच करू शकली. मुंबईसाठी सौरभ तिवारी ४० चेंडूत नाबाद ५० धावा करु शकला, यामध्ये त्याने ५ चौकार मारले आहेत. चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ८८ धावा केल्या असून ही त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली, रवींद्र जडेजा २६ धावांसह पाचव्या विकेटसाठी त्याने ८१ आणि ड्वेन ब्राव्होसह सहाव्या विकेटसाठी ३९ (आठ चेंडूत तीन षटकार). भागीदारीने सहा विकेटसाठी १५६ धावांचे आव्हानात्मक स्कोअर केले.

सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘३० धावांवर चार विकेट गमावल्यानंतर आम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या ठेवायची होती. मला वाटते ऋतुराज आणि ब्राव्होने आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगल्या गुणांवर नेले. आम्ही १४० चा विचार केला पण १६० च्या जवळ जाणे विलक्षण होते. चेंडू विकेटवर असमान वेगाने येत होता, सुरुवातीला चेंडू थोडा हळू येत होता असे धोनीने म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  स्वदेशी क्रिकेटर्सची चांदी, BCCIकडून सामन्याच्या मानधनात भरमसाठ वाढ


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -