घरक्रीडाCSK vs RR IPL 2022: रियान परागने मोडला रोहित शर्मा आणि रवींद्र...

CSK vs RR IPL 2022: रियान परागने मोडला रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाचा विक्रम, आता एबी डिव्हिलियर्सवर लक्ष्य

Subscribe

राज्यस्थान रॉयल्स (RR) संघाने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या १५ व्या हंगामातील प्लेऑफमधील स्थान पक्कं केलं आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात राजस्थान संघाने महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni)
नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) ५ गडी राखून विजय केला. यासह हा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

गुवाहाटीमध्ये राहणारा २० वर्षांचा युवा खेळाडू रियान परागसाठी (Riyan Parag) हा हंगाम उत्कृष्ट राहिलेला नाहीये. परंतु त्याला १४ सामन्यांमध्ये १६४ धावा करता आल्या आहेत. दरम्यान, त्याने केवळ एक अर्धशतक झळकावलं आहे. मात्र, याशिवाय रियानने या हंगामात एक नवा विक्रम केला आहे. यासोबतच रोहित शर्मा (Rohit Sharma), रवींद्र जाडेजा या स्टार खेळाडूंनाही फटका बसला आहे.

- Advertisement -

जाडेजाने दोन्ही हंगामात घेतल्या १३ कॅचेस

रियाने परागने हा विक्रम फलंदाजी आणि गोलंदाजीत नाही तर क्षेत्ररक्षणात केला आहे. वास्तविक, आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक १५ कॅचेस घेणारा रियान भारतीय क्षेत्ररक्षक ठरला आहे. यामध्ये त्याने रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाला मागे टाकत नवीन विक्रम केला आहे. यापूर्वी दोघांनीही एकाच हंगामात १३-१३ कॅचेस घेतले होते. रोहितने २०१२ च्या हंगामात उत्तम कामगिरी केली होती. जाडेजाने हा विक्रम २०१५ आणि २०२१ मध्ये केला होता.

हेही वाचा : Icc Test Rankings : रवींद्र जाडेजाची अफलातून कामगिरी, विराट-रोहितला दिला मोठा धक्का

- Advertisement -

आता एबी डिव्हिलियर्सवर लक्ष्य

आयपीएलच्या एकाच हंगामात १९ कॅचेस घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहेत. २०१६ मध्ये त्याने आयपीएलमध्ये नवीन विक्रम केला होता. २०१७ मध्ये पोलार्डने नवा विक्रम केला होता. त्याने जवळपास १५ कॅचेस घेतल्या होत्या. रियानने सुद्धा १५ कॅचेस घेऊन पोलार्डची बरोबरी केली आहे.
राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशा स्थितीत रियान एबी डिव्हिलियर्सचाही विक्रम मोडू शकतो.

राजस्थानची चेन्नईवर ५ विकेट्सने मात

या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ६ गडी गमावत १५० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मोईन अलीने ५७ चेंडूत ९३ धावा केल्या. तर धोनीने २८ चेंडूत केवळ २६ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने ५ गडी गमावून १५१ धावा केल्या आणि सामना ५ विकेटने जिंकला.


हेही वाचा : DC vs MI Match IPL : जर आमचा पराभव झाला तर.., सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचं मोठं विधान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -