मी आता डिझर्व्ह करत नाही.., भारतीय संघात एन्ट्री मिळाल्यानंतर आयपीएल स्टारचं मोठं वक्तव्य

भारत सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind Vs Sa) टी-२० मालिका (T-20 Series) खेळत आहे. यामध्ये आतापर्यंत भारतीय संघाने दोन सामने गमावले आहेत. भारतीय संघ या मालिकेत युवा खेळाडूंच्या विश्वासावर अवलंबून आहे. कारण भारताचे काही सीनियर खेळाडू सुट्टीवर आहेत. दरम्यान, आयपीएलमधून (IPL 2022) प्रकाश झोतात येणारा युवा खेळाडू रियान परागने (Riyan Parag) भारतीय संघात एन्ट्री मिळाल्यानंतर मोठं वक्तव्य केलं आहे.

इंडियन प्रीमियर लीग-२०२२ च्या १५ व्या हंगामात रियान परागने उत्कृष्ट अशी कामगिरी केली नव्हती. फक्त एक ते दोन सामन्यांमध्ये रियाने परागने आपली ताकद दाखवली होती. रियान म्हणाला की, त्याच्या संघासाठी सामने जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु इतर सामन्यांमध्ये यंदाच्या हंगामात मी चांगली कामगिरी दाखवू शकलो नाही, असं रियान पराग म्हणाला.

पुढे रियान पराग म्हणाला की, जर मी माझ्या संघाला पाच ते सहा सामने जिंकून दिले असते. तर ते चांगले दिसले असते. परंतु जर माझे नाव संभाव्य यादीत आले तर मलाही बरे वाटणार नाही. तसेच मी ते डिझर्व्ह करत नाही. येणाऱ्या हंगामात माझा आत्मविश्वास दृढ झालेला असेल. जर मी माझ्या संघासाठी चांगले प्रदर्शन करू शकलो, तर ते उत्तमच ठरेल.

आयपीएल २०२२ च्या प्रदर्शनावर रियाग पराग म्हणाला की, मी माझ्या फलंदाजीच्या सध्याच्या स्थितीवर खूश आहे. परंतु यंदाच्या हंगामात मी ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यावर मी नाखूश आहे. मला ६-७ व्या क्रमांकावर अधिक चांगली कामगिरी करायची आहे. जर तुम्ही पाहिलंत तर एमएस धोनीने स्वत:ला एक फिनिशर खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली आहे. मी त्याच्याकडून खूप काही शिकतो आणि माझ्या खेळात ते मी लागू करण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, २० वर्षीय रियान पराग आयपीएलमधून राजस्थान रॉयल्स या संघातून खेळला होता. या हंगामात रियान परागने १७ सामन्यांच्या १४ डावात फक्त १८३ धावा केल्या होत्या. अनेक वेळा त्याला सामना संपविण्याची संधी मिळाली होती. मात्र, तो वारंवार अपयशी ठरला. त्यामुळे त्याने आपली खदखद व्यक्त केली आहे.


हेही वाचा : प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मालकीच्या पबला आग; स्वत: ट्विट करत दिली माहिती