घरक्रीडारोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे दुसरे पर्व 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरमध्ये होणार

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे दुसरे पर्व 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरमध्ये होणार

Subscribe

आशिया चषकानंतर पुन्हा एकदा रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे दुसरे पर्व सुरू होणार आहे. येत्या 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालवधीत हे पर्व पार पडणार आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या पर्वात पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे भारतीय लीजेंड्सचे नेतृत्व देण्यात आले आहे.

आशिया चषकानंतर पुन्हा एकदा रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे दुसरे पर्व सुरू होणार आहे. येत्या 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालवधीत हे पर्व पार पडणार आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या पर्वात पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे भारतीय लीजेंड्सचे नेतृत्व देण्यात आले आहे. मागील पर्वात भारतीय लीजेंड्स संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे जेतेपद पटकावले होते. (road safety world series season 2 sachin tendulkar will play)

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा पर्वात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह यांच्यासह सर्व माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहेत. या स्पर्धेतील पहिले सात सामने 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान लखनौच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. यानंतर पुढील 5 सामने 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान जोधपूरमध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर 6 सामने 21 ते 25 सप्टेंबर या कालवधीत कटकमध्ये होणार आहे. या सिरीजचे शेवटचे आणि नॉकआऊट सामने 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत.

- Advertisement -

या सिरीजच्या पहिल्या सत्रात 7 संघ सहभागी झाले होते. ‘न्यूझीलंड लीजेंड्स’ या आणखी एका संघाचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. इंडिया लिजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्ससह एकूण 8 संघ या हंगामात खेळणार आहेत.

या हंगामातही सचिन तेंडुलकरच पुन्हा एकदा भारतीय लीजेंड्स संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. सचिनसोबत युवराज सिंह, इरफान पठाण, युसूफ पठाण, राहुल शर्मा हे खेळाडूही असणार आहेत. या सिरीजसाठी 7 सप्टेंबरपर्यंत सर्व खेळाडू लखनऊमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामात सचिन तेंडुलकरने इंडिया लीजेंड्स संघाचे कर्णधारपद संभाळले होते. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामात भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजनं उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर भारत आणि श्रीलंकेचा यांच्यात रायपूरमध्ये अंतिम सामना रंगला.

श्रीलंकाविरुद्ध अंतिम सामन्यात युसूफ पठाणनं दमदार फलंदाजी केली. या सामन्यात त्याने 36 चेंडूत 62 धावा केल्या. तर, युवराज सिंहने 41 चेंडूत 60 धावा केल्या. श्रीलंकेकडून सनथ जयसूर्या आणि चिन्थाका जयसिंघे यांनी चांगली फलंदाजी केली. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. हा सामना भारतानं 14 धावांनी जिंकला.


हेही वाचा – भारतीय संघ आणि हाँगकाँगमध्ये होणार लढत, अशी असेल संघाचे प्लेइंग 11?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -