मुंबई : वर्ल्डकप 2019 मध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण हा वर्ल्डकप भारतीय संघासाठी चांगलाच गाजला होता. कारण 2019 चा वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या संघनिवडीबाबत मोठी चर्चा सुरू होती. त्यावेळी भारतीय संघाचा फलंदाज अंबाती रायुडू याची या वर्ल्डकपच्या संघात निवड करण्यात आली नव्हती. मात्र, भारतीय संघात फलंदाजाची गरज असतानाही अंबाती रायडूला स्थान न दिल्याने हा वर्ल्डकप सुरूवातीपासूनच तो चर्चेचा विषय होता. मात्र, अंबाती रायडूला 2019च्या वर्ल्डकपमध्ये का स्थान देण्यात आलं नाही, याचा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 2007 टी-20 वर्ल्डकप विजेता रॉबिन उथप्पा याने रायुडूच्या निवडीबाबत मोठा खुलासा केला. (Robin Uthappa blames Virat Kohli For Ambati Rayudu Controversial Snub)
रॉबिन उथप्पा याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, त्यावेळी उथप्पाने या अंबाती रायडूला 2019च्या वर्ल्डकपमध्ये का संधी देण्यात आली नाही, त्यावर वक्तव्य केलं आहे. त्यानुसार, “जर विराटला कोणी आवडत नसेल किंवा त्याला जर वाटलं एखादी व्यक्ती चांगली नाहीये, तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत असे. अंबाती रायडू हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. सर्वांनाच त्याच्याबरोबर घडलेली घटना पाहून वाईट वाटते. प्रत्येकाची स्वतःची आवड असते, प्रत्येक खेळाडू हा या पातळीपर्यंत पोहोचयाला जीव ओतून प्रयत्न करत असतो”, असा धक्कादायक दावा रॉबिन उथप्पा याने केला आहे.
याशिवाय, “मान्य आहे की प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते, पण एखाद्या खेळाडूच्या तोंडावर तुम्ही दरवाजे बंद करू शकत नाही. माझ्यासाठी हे चुकीचं आहे. त्याची वर्ल्डकपची जर्सी, किट बॅग, सर्वकाही होतं, ते त्याच्या घरी पाठवलं होतं. एखादा खेळाडू असा विचार करत असेल की मी आता वर्ल्डकप खेळणार आहे. माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. मी एका महत्त्वपूर्ण ठिकाणी खेळणार आहे. मला माझ्या देशासाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे. तुम्ही कोणाहीबरोबर असं केलं नाही पाहिजे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की या अशा वागण्यामुळे एखाद्याच्या मनावर याचा किती खोल परिणाम होईल, खेळाडू जाऊदे पण एक व्यक्ती म्हणून हा प्रकार त्याच्या मनात खोलवर गेलेला असेल. तुम्ही असं वागून एखाद्याच्या आत्मविश्वासाला तडा देत आहेत. त्यापेक्षा साधारण त्याच्याशी चर्चा करून सांगणं सोपं होतं. हा असा तडकाफडकी निर्णय घेण्यामागचं काय कारण होतं”, असेही रॉबिन उथप्पा यावेळी म्हणाला.
हेही वाचा – IPL 2025 : अखेर आयपीएलची तारीख ठरली; BCCI उपाध्यक्षांनी केली घोषणा