नवी दिल्ली : जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तेव्हापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सचिवपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांची बोर्डाचे अंतरिम सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. घटनेत दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करत बीसीसीआय अध्यक्षांनी देवजीत सैकिया यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. (Roger Binny appoints Devajit Saikia as BCCI Secretary)
बीसीसीआयच्या घटनेच्या अनुच्छेद 7.2 (डी) मध्ये असे म्हटले आहे की, “कार्यालयातील कोणतीही जागा रिक्त असल्यास किंवा पदाधिकारी आजारी असल्यास, तसेच रिक्त जागा योग्यरित्या भरली जाईपर्यंत किंवा आजारी व्यक्ती बरा होईपर्यंत बीसीसीआय अध्यक्षाने दुसऱ्या पदाधिकाऱ्याला कर्तव्ये सोपविली पाहिजे. मात्र, पुढील तीन वर्षांच्या बीसीसीआयच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याने ही व्यवस्था पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र निवडणूक होईपर्यंत नवीन सचिवाची निवड होऊ शकत नाही. त्यामुळे देवजीत सैकिया यांची सचिवपदी नियुक्ती केल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – Vinod Kambli : तो खूप चांगला खेळाडू, त्याला…; विनोद कांबळीबद्दल काय म्हणाले अमित शहा?
जय शाह हे गेली अनेक वर्षे बीसीसीआयच्या सचिव पदावर कार्यरत होते. मात्र डिसेंबर 2021 मध्ये जय शहा यांनी आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागले. आयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर जय शहा हे इतर कोणत्याही सदस्य मंडळाशी जोडले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे गेल्या काही काळापासून बीसीसीआयला अंतरिम सचिवाची नियुक्ती आवश्यक होती. देवजीत सैकिया यांना सचिवपदी आणण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळाले होते. जेव्हा आयसीसीमध्ये ते बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करताना दिसून आले होते. जय शहा यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 5 डिसेंबर रोजी दुबईत आयसीसीच्या बैठकीत देवजीत सौकिया हे उपस्थित होते.
देवजीत सैकिया यांच्याबद्दल…
दरम्यान, बीसीसीआयचे अंतरिम सचिव देवजीत सैकिया यांचा जन्म 1969 मध्ये झाला आहे. ते गुवाहाटी येथील रहिवासी असून त्यांनी 1984 मध्ये आसामकडून सीके नायडू ट्रॉफी खेळली आहे. याशिवाय सध्या ते बीसीसीआयचे सहसचिव देखील होते. देवजीत सैकिया हे पेशाने वकील असून ते क्रिकेट प्रशासकही आहेत. त्यांनी सौरव गांगुलीसोबत पूर्व विभागीय संघात चमकदार कामगिरी केली होती. यानंतर 1991 मध्ये आसामकडून रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू केला होता. अशातच आता देवजीत सैकिया यांना पुढील 10 महिन्यांसाठी बीसीसीआयच्या सचिवपदावर काम करावं लागणार आहे.
हेही वाचा – Sunil Gavaskar : उरलेले दोन दिवस सत्कारणी लावा, हॉटेलच्या रूमवर…; गावसकरांचा टीम इंडियाला सल्ला