घरक्रीडामी यावर लवकरच मात करेन; गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर रॉजर फेडररची प्रतिक्रिया

मी यावर लवकरच मात करेन; गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर रॉजर फेडररची प्रतिक्रिया

Subscribe

रॉजर फेडरर आपल्या उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्येही खेळू शकला नव्हता.

अमेरिकन ओपन स्पर्धेतून स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिसऱ्यांदा ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. २०२० मध्ये रॉजर फेडररच्या गुडघ्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया केली होती यामुळे फेडरर टेनिस कोर्टपासून दूर होता. तिसरी शस्त्रक्रिया झाल्यानंतर फेडररने प्रतिक्रिया दिली आहे. फेडररने म्हटलं आहे की, माझ्या मागे सर्वात वाईटस्थिती आहे. येणाऱ्या सर्व संकटांचा सामना मी करतो आहे.

मी येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करतो आहे. सध्या माझ्या मागे वाईट काळ सुरु आहे. दुखापत झाल्यानंतर तुम्ही परत येता तेव्हा तुमचे सर्व दिवस चांगले जातात. ही मानसिक समस्या नाही परंतु मी यातुन गेलो आहे. आता माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. काही दिवसांमध्ये मी दुखापतीमधून बरा होईल. तसेच सध्या कोणतीही अडचण वाटत नसल्यामुळे मला आशा आहे की, लवकरच पुर्वीप्रमाणे ताकदीने टेनिसकोर्टमध्ये पुनरागमन करेल. परंतु टेनिस कोर्टवर येण्यासाठी मला संयम बाळगावा लागेल असे आपल्या निवेदनात रॉजर फेडररने म्हटलं आहे.

- Advertisement -

रॉजर फेडरर आपल्या उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्येही खेळू शकला नव्हता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे २०२० वर्षापासून रॉजर टेनिस कोर्टपासून दूर आहे. २०२० मध्ये रॉजर फेडररच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आला. तर आता तिसरी शस्त्रक्रिया केली आहे. २०२० मधील मे महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये पुनरागमन करत विजय मिळवला होता. परंतु विम्बलडनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत रॉजरला अपयश आलं. तर रॉजरने २०१९ साली रॉजरने ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकावला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -