घरक्रीडारोहन धुरी 'आरएम भट श्री' चा मानकरी

रोहन धुरी ‘आरएम भट श्री’ चा मानकरी

Subscribe

मुंबई : पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर अन्य स्पर्धकांच्या तगड्या आव्हानावर मात करणारा रोहन धुरी यंदाचा खुली ‘आर एमभट श्री’ स्पर्धेचा किताब विजेता ठरला. त्याला २१ हजार रोख, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. रोहन धुरीला कडवी झुंज देणारा संजय जाधव उपविजेता ठरला. तर मेन्स फिजिक्समध्ये प्रतिक साळवी याने विजेतेपद पटकावले.

यंदाची ‘आर एमभट श्री’ शरारसौष्ठव स्पर्धा देखील रंगतदार झाली. यंदा हि स्पर्धा परळ, लालबाग, काळाचौकी, नायगाव विभागातील खेळाडूंसाठी खुली करण्यात आली होती. विविध वजनी गटात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत रोहन धुरी सरस ठरला. प्रणव खातू याने रोहनला जबरदस्त टक्कर दिली. पण अखेर रोहन उजवा ठरला. प्रणवला यावेळचा बेस्ट इम्प्रुव्हमेंट शरीरसौष्ठव म्हणून गौरविण्यात आले. संजय जाधव या स्पर्धेत उपविजेता ठरला तर ‘राम जी कि निकली सवारी’… या गाण्यावर अफलातून पोझिंग करत उपस्थितांची मनं जिंकणारा ओमकार साईम हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला. गटविजेत्यांसह सर्व स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू संदीप जाधव, जालिंदर आपके, प्रविण गणवीर, अमर भंडारी यांनी स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी माजी  ‘आरएम भट श्री’ विजेते खेळाडू देखील उपस्थित होते. तर भाई आंबोले, विक्रांत देसाई, काशिनाथ जाधव, विष्णु घाग, भुषण पाटकर, अभिषेक फुटाणे, हेमल राणा, सुशांत चौगुले, अभिषेक मानकर आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रशांत खामकर यांनी स्पर्धेचे सुत्रसंचालन केले.

 

- Advertisement -

 


हेही वाचा ; U19 World Cup : कर्णधाराच्या शतकामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत; वडील आहेत बीसीसीआयमध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -