Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 PHASE 2 : रोहित परतला मुंबई इंडियन्सच्या घरात

IPL 2021 PHASE 2 : रोहित परतला मुंबई इंडियन्सच्या घरात

हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलसाठी सज्ज

Related Story

- Advertisement -

आयपीएलची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रासाठी यूएईला पोहोचला आहे. रोहित शर्माने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. रोहितने आपली मुलगी आणि पत्नीसह त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याच्या मागे मुंबई इंडियन्स बॅनरसह एक चित्र पोस्ट केले. रोहितने या चित्रासह घरी परत पोहचलो असे लिहले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्यासह रोहित शर्मा चार्टर विमानाने अबू धाबीला पोहोचले आहेत.

- Advertisement -

इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर, असे कळवण्यात आले की सर्व खेळाडू चार्टर्ड विमानांने दुबई येथे पोहचतील, तर फ्रँचायसी खेळाडूंसह कोणताही धोका पत्करु इच्छित नाहीत, ज्यामुळे त्यांना यूके ते यूएई पर्यंत येण्यासाठी चार्टर विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

याशिवाय, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील यूएईला पोहोचण्याची तयारी करत आहेत, आरसीबीने त्यांच्यासाठी वेगळ्या चार्टर विमानाची व्यवस्था केली आहे. आरसीबीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वोच्च प्राधान्य देऊ” असे आरसीबीने म्हंटले आहे.

आता सर्व खेळाडू खाजगी विमानाने यूएईला पोहोचणार असल्याने यूएईला पोहोचल्यानंतर त्यांना सहा दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. त्यानंतर ते संघाच्या बायो बबलमध्ये सामील होतील. त्यानंतर आयपीएलचा पहिला सामना खेळण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्स १९ सप्टेंबरपासुन मैदानात उतरतील, भारतीय प्रेक्षकांनी आयपीएल २०२१ चा थरार अर्धवट सोडल्यानंतर आता या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा : IPL 2021 PHASE 2 : खेळाडूंसाठी फ्रॅंचायसीची चार्टर्ड प्लेनची सोय, IPL साठी खेळाडू दुबईत रवाना

Neeraj Chopra: पालकांसोबत केला हवाई प्रवास, नीरज चोप्राची स्वप्नपूर्ती

- Advertisement -