घरक्रीडारोहितने मागितली पत्नीची माफी, कारण...

रोहितने मागितली पत्नीची माफी, कारण…

Subscribe

बर्थडेच्या दिवशी पत्नीला वेळ देता न आल्यामुळे रोहितने तिटचा रुसवा घालवण्यासाठी सोशल मीडियावरुन तिची जाहीर माफी मागतिली आहे.

भारतीय संघातील फलंदाज रोहित शर्मा सध्या संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. शांत आणि संयमी स्वभावाच्या रोहित शर्माचे आजपर्यंत खेळाच्या मैदानवर कुणाशीही भांडण झाल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे साहाजिकच क्रिकेटच्या मैदानावर सामन्यादरम्यान कुणाची माफी मागण्याची वेळ त्याच्यावर ओढावलेली नाही. मात्र, याच शांत आणि समंजस खेळाडूवर आपल्या पत्नीची माफी मागण्याची वेळ आली आहे. रोहित शर्माने थेट सोशल मीडियावरुन त्याची पत्नी रितिकी हिची जाहीरपणे माफी मागितली आहे. आपल्या पत्नीची जाहीरपणे माफी मागतानाची एक पोस्ट रोहितने त्यांच्या इन्टाग्राम आणि ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केली आहे. आज (२१ डिसेंबर) रोहितची पत्नी रितिका हिचा वाढदिवस असतो. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे साहाजिकच आज रोहित आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकला नाही. बर्थडेच्या दिवशी पत्नीला वेळ देता न आल्यामुळे रोहितने तिटचा रुसवा घालवण्यासाठी सोशल मीडियावरुन तिची जाहीर माफी मागतिली आहे. यावेळी त्यांनी दोघांचा एक जुना फोटोही शेअर केला आहे.

- Advertisement -

रोहित शर्माने शेअर केलेला हा फोटो रितिकाच्या गेल्यावर्षीच्या वाढदिवसाचा आहे. हा गोड फोटो शेअर करत रोहितने यावर्षीच्या वाढदिवसाला उपस्थित राहू न शकल्याबद्दल तिची माफी मागितली आहे. ‘माझ्या धर्मपत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझ्या बायकोच्या वाढदिवसाला मी तिच्याबरोबर नाही याची मला खंत आहे. हा वाढदिवस असा आहे, ज्या वाढदिवसासाठी मला रिमाइंडर लावावा लागत नाही’ अशा अर्थाचं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट जबरदस्त व्हायरल होत असून, जगभरातील क्रिकेट प्रेमी आणि रोहित शर्माचे चाहते त्याला भरभरुन पसंती देत आहेत. इतकंच नाही तर फॅन्सनी कमेंट्सच्या माध्यमातून रितिका शर्मावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

ट्वीटरवरुनही शुभेच्छा

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -