घरक्रीडाODI World CUP 2023 : दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरबाबत रोहित शर्माची मोठी अपडेट;...

ODI World CUP 2023 : दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरबाबत रोहित शर्माची मोठी अपडेट; म्हणाला…

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) सर्व खेळाडूंनी वनडे वर्ल्डकपच्या सरावाला सुरूवात केली. अनेक संघात नव्या खेळाडूंचं पदार्पण होत असून, काही खेळाडूंना फॉर्म नसल्याकारणाने संघाबाहेर ठेवले जात आहे. अशातच भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) सर्व खेळाडूंनी वनडे वर्ल्डकपच्या सरावाला सुरूवात केली. अनेक संघात नव्या खेळाडूंचं पदार्पण होत असून, काही खेळाडूंना फॉर्म नसल्याकारणाने संघाबाहेर ठेवले जात आहे. अशातच भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान अय्यरबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, श्रेयस अय्यर परतीच्या मार्गवर आहे. रोहितच्या वक्तव्यावरून काहीही स्पष्ट झाले नाही पण अय्यर पुन्हा फिटनेस मिळवू शकतो याचा अंदाज लावता येतो. (Rohit Sharma Big Update On Shreyas Iyer Fitness Before Icc World Cup 2023)

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने संघातील श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट दिली आहे. श्रेयस अय्यरच्या विश्वचषकातील सहभागावर अजूनही शंका कायम आहे. वर्ल्डकपला अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र, या स्पर्धेपर्यंत स्टार फलंदाज श्रेयस अय्यर फिट होईल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. अय्यर वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार नसल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला असून वर्ल्डकपपर्यंत अय्यर तंदुरुस्त होईल, असे मानले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, श्रेयस अय्यर त्याच्या दुखापतीतून बऱ्यापैकी बरा झाला आहे, पण त्याला मॅच फिट होण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे तो आशिया कप 2023 मधून बाहेर पडू शकतो. पण अय्यर जर आशिया कप खेळला नाही तर त्याचे थेट वर्ल्डकपमध्ये उतरणे अत्यंत घातक ठरू शकते. संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अय्यरसाठी वर्ल्डकपपूर्वी तंदुरुस्त होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण संघाला आतापर्यंत त्याच्यासाठी चांगला बदली खेळाडू शोधता आलेला नाही.

सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा संघाला आशिया कप आणि वनडे वर्ल्डकप यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. मात्र या मोठ्या स्पर्धांपूर्वी संघातील अनेक मोठे खेळाडू जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs WI : भारताने सामना गमावला, पण ICCकडून दोन्ही संघांवर कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -