घरक्रीडाIndia vs Sri Lanka T20: हिटमॅनला T20 मालिकेत रेकॉर्ड करण्याची मोठी संधी,...

India vs Sri Lanka T20: हिटमॅनला T20 मालिकेत रेकॉर्ड करण्याची मोठी संधी, धोनी-विराटच्या खास यादीत समावेश होणार

Subscribe

वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने वर्चस्व स्थापन केल्यानंतर आता श्रीलंकेविरूद्धच्या सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेवर सर्वाचं लक्ष लागलं आहे. भारत दौऱ्यावर असणाऱ्या श्रीलंका संघाला तीन टी-२० सामने खेळायचे आहे. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया आज लखनऊच्या स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे. २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी धर्मशाला येथे दोन सामने खेळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माला आपल्या नावावर मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

टीम इंडियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्याचा विक्रम करणारा रोहित शर्मा जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारा खेळाडू ठरू शकतो. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी १२२ सामने खेळले आहेत. तर टी-२० मध्ये १२४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. यावेळी रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धचे तीनही टी-२० सामने खेळले तर तो शोएब मलिकला मागे टाकू शकतो.

- Advertisement -

रोहित शर्माला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंच्या यादीत समावेश करण्याची संधी आहे. ३४ वर्षीय फलंदाजाने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ६३ धावा केल्यानंतर तो विक्रम करणारा तिसरा खेळाडू ठरणार आहे. एकूणच सर्व खेळांच्या फॉरमॅटमध्ये त्याला दहावा क्रमांक लागेल. रोहित २६ व्यांदा संघाचे नेतृत्व करणार आहे. जर त्याने १००० धावांचा टप्पा आलांडला तर तो बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. शर्माला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मार्टीन गप्टिलला देखील मागे टाकण्याची संधी आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 खेळणारे खेळाडू

1. शोएब मलिक (पाकिस्तान) – १२४
2. रोहित शर्मा (भारत) – १२२
3. मोहम्मद हाफीज (पाकिस्तान) – १९९
4. इऑन मॉर्गन (इंग्लंड) – ११५
5. महमुदुल्लाह (बांगलादेश) – ११३

- Advertisement -

हेही वाचा : मलिकांचा राजीनामा न स्वीकारण्याची राज्य सरकारची भूमिका, गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंदोलन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -