भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि धडाडीचा फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. घरात नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे सर्व शर्मा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान या गोड बातमीची माहिती रोहित शर्माची चुलत मेहुणी आणि सोहेल खानची पत्नी सिमा खानने इन्स्टाग्रामवर दिली आहे. आपण माऊशी झालो अशी पोस्ट सिमाने इन्स्टाग्रामवर टाकली आहे आणि त्यासोबतच तिने रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिकाला टॅग केले आहे.
And its a Baby girl….?♀️
Congratulations Mr. & Mrs. ROHIT SHARMA…??@ImRo45 @ritssajdeh pic.twitter.com/mKOFhTZhm9— RoUniverse (@RoUniverse45) December 30, 2018
चाहत्यांकडून अभिनंदन
१३ डिसेंबर २०१५ रोजी रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा विवाह झाला होता. त्यानंतर आता तीन वर्षानंतर रोहित शर्माला कन्यार्तन प्राप्त झाले आहे. दरम्यान ही गोड बातमी समजताच चाहत्यांडून रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
रोहित शर्मा मुंबईला रवाना
सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा ज्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा खेळला ते दोनही सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यासोबत एका मुलाखतीमध्ये रोहितने आपण लवकर बाप होणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी सगळ्यांकडून आनंद व्यक्त केला गेला होता. आज म्हणजे सोमवारी सकाळी रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोंडस अशा मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आपल्या मुलीला पाहण्यासाठी आणि पत्नीला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथून मुंबईच्या दिशेला रवाना झाला आहे.
BCCI: Rohit Sharma left for Mumbai to attend to his wife who has delivered a baby girl. Rohit will miss the final Test. There will be no replacement player in the Test squad. He will join the ODI squad on the 8th of January 2019, (file pic) #AUSvIND pic.twitter.com/f2cECVoUUx
— ANI (@ANI) December 31, 2018
हेही वाचा – रोहित शर्माच्या ट्विटला शाहरूखचं मजेशीर उत्तर