IND vs BAN 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का, रोहित शर्मा रुग्णालयात दाखल

Pragyan Ojha comment rohit sharma great captain because of Adam Gilchirst

भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. परंतु या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हाताला अचानक चेंडू लागल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आहे. तसेच दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

बांगलादेशविरुद्धचा सामना ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली. मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर अनामूल हकने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला, त्यावेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने मोहम्मद सिराजच्या चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. अशाप्रकारे तो झेलही पकडू शकला नाही आणि त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. रोहितच्या दुखापतीनंतर त्याला एक्स-रेसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्याने माजी कर्णधार विराट कोहलीकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेश संघाने १४ ओव्हर्समध्ये ३ बाद ५७ धावा केल्या आहेत. तर मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या आहेत.


हेही वाचा : मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी, हाताला दुखापत होऊनही पटकावले रौप्य पदक