घरक्रीडाकर्णधार रोहित शर्मा जायबंदी

कर्णधार रोहित शर्मा जायबंदी

Subscribe

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी भारताला धक्का

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सराव सत्रादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या मांडीला चेंडू लागला. त्यामुळे त्याला सराव सत्र अर्ध्यातच सोडावे लागले. ही दुखापत किती गंभीर आहे, हे अजून कळलेले नाही. मात्र, त्याला या दुखापतीमुळे पहिल्या टी-२० सामन्याला मुकावे लागल्यास भारताला मोठा धक्का बसेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

शुक्रवारी नेट्समध्ये सराव करताना एक चेंडू रोहितच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने लगेचच नेट्स सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तसेच चेंडू ज्या वेगाने फेकला जात होता, त्याबाबतही त्याने नाराजी व्यक्त केली. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाजांना डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रेहमानचा सामना करावा लागणार आहे. त्याच्याविरुद्ध खेळण्याचा सराव व्हावा यासाठी भारतीय संघाने श्रीलंकेवरून एका विशेष डावखुर्‍या गोलंदाजाला बोलावले आहे. त्यानेच फेकलेला एक चेंडू रोहितच्या मांडीला लागला. त्यानंतर लगेचच रोहितला झालेल्या दुखापतीवर वैद्यकीय टीम उपचार केले.

- Advertisement -

तसेच या सराव सत्रात संजू सॅमसनने यष्टिरक्षण न करता क्षेत्ररक्षणाचा सराव केला. दुसरीकडे रिषभ पंत यष्टिरक्षणावर बरीच मेहनत घेताना दिसला. त्यामुळे या मालिकेत तोच यष्टींमागे उभा राहणार हे जवळपास निश्चित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -