घरक्रीडाRohit Sharma News : हिटमॅन रोहित शर्मा लवकरच होणार निवृत्त? त्या विधानामुळे...

Rohit Sharma News : हिटमॅन रोहित शर्मा लवकरच होणार निवृत्त? त्या विधानामुळे चर्चांना उधाण

Subscribe

आगामी काळात क्रिकेटविश्वात महत्त्वाच्या स्पर्धा पार पडणार आहेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएलनंतर टी-20 वर्ल्डकप आणि पुढील वर्षात (2025) टेस्ट वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे तिन्ही स्पर्धांसाठी भारतीय खेळाडूंचा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या क्रिकेटविश्वात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे.

मुंबई : आगामी काळात क्रिकेटविश्वात महत्त्वाच्या स्पर्धा पार पडणार आहेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएलनंतर टी-20 वर्ल्डकप आणि पुढील वर्षात (2025) टेस्ट वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे तिन्ही स्पर्धांसाठी भारतीय खेळाडूंचा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या क्रिकेटविश्वात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. कारण रोहित शर्मा 36 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे वय-वर्ष 35 नंतर खेळाडुच्या निवृत्तीची चर्चा होत असते. या सगळ्यात रोहितने एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे पुढील महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वीच रोहित शर्मा निवृत्ती घोषित करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rohit Sharma News indian INDIAN CRICKET TEAM Captain Test World Cup)

एका खासगी कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने निवृत्तीबाबत भाष्य केलं. त्यानुसार, “मी सध्या चांगला खेळत आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे मी क्रिकेट खेळत राहण्याचा माझा विचार आहे. मला विश्वचषक जिंकायचा आहे. टेस्ट चॅम्पियनशिप पुढील वर्षी आहे. मला वाटते भारत या चॅम्पियनशिपमध्ये जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल. 50 षटकांचा वर्ल्डकप हा माझ्यासाठी खरा वर्ल्डकप आहे. आम्ही 50 षटकांचा वर्ल्डकप पाहत मोठे झालो आहोत”, असे भाष्य रोहित शर्माने केले.

- Advertisement -

रोहित शर्माची कारकीर्द –

  • रोहित शर्माने 59 टेस्ट सामन्यांव्यतिरिक्त 262 वनडे आणि 151 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • आयपीएलचे 248 सामने खेळले आहेत.
  • रोहित शर्माने टेस्ट फॉरमॅटमध्ये 45.47 च्या सरासरीने 4138 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 12 शतकांव्यतिरिक्त त्याने 17 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.
  • वनडे फॉरमॅटमध्ये रोहित शर्माने 49.12 च्या सरासरीने 10709 धावा केल्या आहेत.
  • वनडे फॉरमॅटमध्ये रोहितच्या नावावर 31 शतके आणि 55 अर्धशतकं आणि तीन वेळा द्विशतकं झळकावण्याचा विक्रम आहे.

हेही वाचा – Mumbai Indians Match : IPLवर मुंबईचा दबदबा कायम; एकाही संघाला न जमलेला विक्रम नावावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -