घरक्रीडाIND vs AUS : रोहित शर्मा फिटनेस चाचणीत पास, ऑस्ट्रेलियाला जाण्याचा मार्ग...

IND vs AUS : रोहित शर्मा फिटनेस चाचणीत पास, ऑस्ट्रेलियाला जाण्याचा मार्ग मोकळा

Subscribe

रोहितची शुक्रवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) फिटनेस चाचणी झाली.

भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. रोहितला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेला मुकावे लागले. त्यातच रोहित आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळण्याबाबतही साशंकता होती. मात्र, रोहितची शुक्रवारी बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) फिटनेस चाचणी झाली. या चाचणीत तो पास झाला असून १४ डिसेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून रोहित त्याआधी तीन दिवस ऑस्ट्रेलियासाठी रवाना होऊ शकेल. त्यानंतर त्याला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. त्यामुळे तो केवळ अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकेल. अखेरचे दोन सामने हे सिडनी (७ ते ११ जानेवारी) आणि ब्रिस्बन (१५ ते १९ जानेवारी) येथे होणार आहेत.

- Advertisement -

‘रोहित शर्मा फिटनेस चाचणीत पास झाला असून तो लवकरच ऑस्ट्रेलियात दाखल होईल,’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. रोहितची शुक्रवारी फिटनेस चाचणी झाली त्यावेळी एनसीएचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड उपस्थित होता. रोहितच्या फिटनेसबाबत मागील काही काळ बरीच चर्चा होत आहे. रोहितला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. आयपीएल संपल्यावर भारताचे सर्व खेळाडू थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाले, पण रोहितने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवड समितीने त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघात निवड केली नाही. तसेच कसोटी मालिकेसाठी त्याची निवड फिटनेस चाचणी पास झाल्यावरच करण्यात येईल असेही बीसीसीआयने स्पष्ट केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -