घरक्रीडाराहुल द्रविडसोबत काम करण्यासाठी उत्सुक रोहित शर्मा, म्हणाला...

राहुल द्रविडसोबत काम करण्यासाठी उत्सुक रोहित शर्मा, म्हणाला…

Subscribe

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडचे अभिनंदन केले आहे

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडचे अभिनंदन केले आहे. द्रविड अधिकृतरित्या भारतीय संघाचा प्रशिक्षक असल्याची माहिती भारतीय क्रिकेट बोर्डोने (BCCI) बुधवारी दिली. तो रवी शास्त्रीच्या जागी न्यूझीलंडच्या मालिकेपासून संघाच्या प्रशिक्षकपदाचा कारभार सांभाळणार आहे. शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. द्रविडची प्रशिक्षक पदासाठी निवड झाल्यापासून क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावर द्रविडच्या प्रशिक्षक पदाबाबत उत्सुक असल्याचे रोहितने सांगितले.

रोहितने सांगितले की, “ज्यावेळी याची घोषणा झाली, त्यावेळी आम्हाला काहीच माहित नव्हते. कारण आम्ही अफगाणिस्तान सोबत सामना खेळत होतो. द्रविड हे सतत भारतीय संघासाठी काही ना काही योगदान देत असतात. आता एका नव्या भूमिकेसाठी त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. संघ त्याच्यांसोबत काम करण्यासाठी उत्साहित आणि तयार आहे. द्रविड भारतीय संघाचे स्टार खेळाडू आहेत. त्याच्यांसोबत काम करताना मज्जा येईल. रोहितने हे अफगाणिस्ताच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

द्रविडचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. याअगोदर तो बंगळुरूमध्ये असलेल्या नॅशनल अकादमीचा अध्यक्ष होता. द्रविडने २००३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा कारभार सांभाळला होता. टी-२० विश्वचषकानंतर भारताची न्यूझीलंडसोबत १७ नोव्हेंबरपासून मालिका सुरू होणार आहे. या मालिकेपासूनच द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून संघासोबत जोडला जाणार आहे. न्यूझीलंडसोबत भारताचे २ कसोटी आणि ३ टी-२० सामने होणार आहेत.


हे ही वाचा: T20 world cup 2021: BAN VS AUS बांगलादेशला नमवत ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून सहज विजय

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -