घरक्रीडाकुर्टर-नाईलला रोहितचे खणखणीत उत्तर !

कुर्टर-नाईलला रोहितचे खणखणीत उत्तर !

Subscribe

ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्याआधी कुर्टर-नाईल आम्ही रोहितला 'शॉर्ट' बॉल टाकून आउट करू असे म्हणाला होता.

भारत सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पहिल्यांदा टी-२० मालिका होत आहे. या मालिकेतला तिसरा सामना आज सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद १६४ धावा केल्या. तर भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य १९.४ षटकांत गाठले. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात केली होती. या दोघांनीही आक्रमक फलंदाजी केली होती. रोहितने काही अप्रतिम फटके मारले. त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नेथन कुर्टर-नाईलला अप्रतिम पूल मारत षटकार लगावला. ही मालिका सुरु होण्याआधी कुर्टर-नाईलने आम्ही रोहितला ‘शॉर्ट’ बॉल टाकून सतावू आणि आउट करू असे विधान केले होते. पण रोहितने आजच्या सामन्यात त्याला खणखणीत उत्तर दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -