घरक्रीडाIND vs ENG : दुखापतींचा सामना; पहिल्या वनडेत चार प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त 

IND vs ENG : दुखापतींचा सामना; पहिल्या वनडेत चार प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त 

Subscribe

चौघेही दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी (काल) पार पडला. भारताने हा सामना ६६ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या सामन्यादरम्यान भारत आणि इंग्लंडच्या प्रत्येकी दोन-दोन खेळाडूंना दुखापती झाल्या. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यरला, तर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्सला दुखापत झाली. त्यामुळे हे चौघेही दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. या मालिकेतील दुसरा सामना २६ मार्चला (शुक्रवार) पुण्यातच खेळला जाणार आहे.

श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत

पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्माच्या हाताला चेंडू लागला. त्यामुळे त्याने इंग्लंडच्या डावात क्षेत्ररक्षण केले नाही. तर श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाला. इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात जॉनी बेअरस्टोने मारलेला फटका अडवण्यासाठी श्रेयसने सूर (डाईव्ह) मारला. त्यावेळीच त्याचा डावा खांदा दुखावला. फिजिओ त्याला घेऊन लगेच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे तो उर्वरित दोन सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

दोघेही फलंदाजीला आले

दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनच्या उजव्या हाताला दुखापत झाली. तर सीमारेषेवर चेंडू अडवताना बिलिंग्सचा खांदा दुखावला. मात्र, हे दोघेही फलंदाजीला मैदानात उतरले. मॉर्गनने २२ धावांची आणि बिलिंग्सने १८ धावांची खेळी केली. परंतु, असे असले तरी हे दोघे दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -