IPL 2022: टाटा यांचे ‘ते’ चॅलेंज रोहितने केलं पूर्ण; सर्वत्र होतेय चर्चा

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील कालचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने ५ धावांनी गुजरातवर विजय मिळवला. मुंबईने सामन्यात विजय मिळवला असला तरी कर्णधार रोहित शर्मा याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील कालचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने ५ धावांनी गुजरातवर विजय मिळवला. मुंबईने सामन्यात विजय मिळवला असला तरी कर्णधार रोहित शर्मा याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. रोहित शर्माने या सामन्यात अशा एक शॉट मारला ज्यामुळे आसाममध्ये आढळणाऱ्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील एक शिंगी गेंड्याला ५ लाख रुपये मिळाले आहे. दरम्यान, यासाठी आयपीएलचे प्रायोजक टाटा यांनी एक चालेंज ठेवलं होतं. तेच चॅलेंज रोहितने पुर्ण केल. त्यामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील एक शिंगी गेंड्याला ५ लाख रुपये मिळाले.

रोहित शर्माने डावातील दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डीप मीडविकेटच्या दिशने षटकार मारला. वेस्ट इंडिजचा गोलंदाज अल्जारी जोसेफने टाकलेल्या लेंथ चेंडूवर रोहितने कडकटत षटकार मारला. हा शॉट इतका अफलातून होता की, चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेबाहेर गेला. रोहित शर्माने मारलेला चेंडू टाटा पंच वर जाऊन लागला आणि त्यामुळेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला 5 लाख रुपये मिळाले.

टाटा हे आयपीएलचे अधिकृत प्रायोजक आहेत. टाटांनी अशी घोषणा केली होती की जर एखाद्या फलंदाजाने सीमारेषेबाहेर असलेल्या पंच कारवर चेंडू मारला तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला ५ लाख रुपये टाटांकडून दिले जातील. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे रोहितच्या या शॉटमुळे फक्त मुंबई इंडियन्सला ६ धावा मिळल्या तर एक चांगले काम देखील झाले.

अखेरच्या षटकात अफलातून गोलंदाजी करणारा डेनियल सॅम्स मुंबईच्या सलग दुसऱ्या विजयाचा हिरो ठरला. मुंबईने रोहित शर्मा, ईशान किशन आणि टिम डेव्हिड यांच्या जोरावर २० षटकात १७७ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल गुजरातला १७२ धावा करता आल्या. मुंबईने ही लढत ५ धावांनी जिंकली. मुंबई-गुजरात सामन्यातील अखेरच्या षटकाची चर्चा सुरू आहे.


हेही वाचा – कसोटीत बेन स्टोक्सची तुफानी फलंदाजी; षटकारांचा पाऊस पाडत 64 चेंडूत केली शतकी खेळी