घरक्रीडारोहित-विराटमध्ये खटपट ?

रोहित-विराटमध्ये खटपट ?

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांत काहीतरी खटपट असल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर रोहित शर्माने कोहलीला अनफॉलो केले आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात सध्या खटपट असल्याच्या चर्चा आहेत. रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले नव्हते. भारतीय फलंदाजांनी या मालिकेतील पहिल्या तीन कसोटीत अतिशय खराब प्रदर्शन केले. असे असतानाही पुढील दोन समान्यांसाठीही त्याला संघात स्थान दिले गेले नाही. पण हनुमा विहारी आणि पृथ्वी शॉ या दोन नव्या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्यामुळेच रोहित निराश झाल्याची शक्यता आहे.

विराटसोबतच अनुष्कालाही केले अनफॉलो

रोहित शर्माने विराट कोहली सोबतच त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मालाही इंस्टाग्राम आणि टि्वटरवर अनफॉलो केले आहे. तर ती सुद्धा रोहितला सोशल मीडियावर फॉलो करत नाही.

आशिया कपसाठी रोहित कर्णधार

आशिया कपला १५ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तर इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेली मालिका ११ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्याजागी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -