IPL 2022 : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी, एका संघाकडून कॅप्टन्सीची ऑफर

कोरोनाचे संकट असल्यामुळे कोरोना काळात आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करण्यात आला होता. परंतु यंदा भारतातच आयपीएलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंरतु कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा भारताबाहेर आयोजन करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Royal Challengers Bangalore Ahmedabad Lucknow Punjab Kings Kolkata Knight Riders interested to bid shreyas iyer
IPL 2022 : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी, एका संघाकडून कॅप्टन्सीची ऑफर

आयपीएल २०२२चा हंगाम अनेक पटीने खास होणार असल्याच्या चर्चा सुरुच आहेत. यामध्ये आता आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी खेळाडू श्रेयस अय्यरला लॉटरी लागली आहे. बहुतांश क्रिकेट फ्रेंचायझी त्यांच्या संघासाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. आयपीएलमध्ये संघाची धुरा सांभाळू शकतील अशा खेळाडूंवर कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्ज, लखनऊ, अहमदाबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघांची नजर आहे.

आयपीएलच्या या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या फ्रेंचायझीची नजर उत्कृष्ठ खेळाडू श्रेयस अय्यरवर आहे. बंगळुरुला पुढील हंगामासाठी कर्णाधाराची गरज आहे. विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यामुळे फ्रेंचायझीची नजर श्रेयस अय्यरवर आहे. यामुळे आरसीबीची फ्रेंचायझी मुंबईच्या या खेळाडूला मेगा ऑक्शनमध्ये संघात घेण्यासाठी प्रयत्न करेल.

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्जची श्रेयस अय्यरवर नजर आहे. परंतु श्रेयस अय्यर त्याच संघात जाणं पसंत करेल ज्या संघात त्याला कॅप्टन्सी देण्यात येईल.

श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्वही श्रेयस अय्यरने केले आहे. मागील हंगामात दिल्लीने त्याच्या ऐवजी ऋषभ पंतवर संघाची कमान सोपवली होती. यानंतर दिल्ली फ्रेचायझीने श्रेयस अय्यरला आपल्या रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंच्या लिस्टमध्येही सामील केले नव्हते.

श्रेयस अय्यर चांगला खेळाडू असून त्याच्याकडे उत्कृष्ठ कौशल्य आहे. मागील हंगामात लिलावात अय्यरला चांगली किंमत मिळाली होती. अमहादाबाद आणि कोलकाताकडून अय्यरला यापूर्वीच ऑफर आली आहे. तसेच अय्यरने दिल्लीचे नेतृत्व करत संघाला उंचीवर नेले होते. तसेच त्याच्या नेतृत्वात दिल्लीने २०२० मध्ये अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला होता. परंतु मुंबईकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. कोरोनाचे संकट असल्यामुळे कोरोना काळात आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करण्यात आला होता. परंतु यंदा भारतातच आयपीएलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंरतु कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा भारताबाहेर आयोजन करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा : Virat Kohli Test Captaincy: विराट कोहलीनंतर कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार?, BCCIने दिली माहिती