Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 Auction: ग्लेन मॅक्सवेलची चांदी; 'या' संघाने केले १४.२५ कोटीत खरेदी 

IPL 2021 Auction: ग्लेन मॅक्सवेलची चांदी; ‘या’ संघाने केले १४.२५ कोटीत खरेदी 

मॅक्सवेल मागील मोसमात पंजाबकडून खेळला होता. 

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या पुढील मोसमाआधीचा खेळाडू लिलाव (Auction) गुरुवारी पार पडत आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला कोणता संघ खरेदी करणार याकडे सर्वांचे लक्ष होती. मॅक्सवेल मागील वर्षी किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. यंदाच्या लिलावात मात्र मॅक्सवेलला तब्बल १४.२५ कोटी रुपयांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने खरेदी केले आहे. त्याला संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी या संघांमध्ये स्पर्धा होती. अखेर त्याला १४.२५ कोटी रुपयांत आरसीबीने खरेदी केले. त्यामुळे तो विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांसारख्या खेळाडूंसह आरसीबीकडून खेळताना दिसेल.

आरसीबीसाठी ठरू शकेल एक्स-फॅक्टर 

- Advertisement -

आरसीबीने मॅक्सवेलला खरेदी केले पाहिजे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले होते. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी सपाट असून सीमारेषा जवळ आहे. तिथे मॅक्सवेल त्याच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करू शकेल. तो आरसीबीसाठी एक्स-फॅक्टर ठरू शकेल, असे गंभीर म्हणाला होता. त्याच्या मतानुसार मॅक्सवेलला आरसीबीने खरेदी केले आहे. मॅक्सवेलला मागील वर्षी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याला १३ सामन्यांत केवळ १०८ धावा करता आल्या होत्या. यंदा आरसीबीकडून खेळताना तो या कामगिरीत सुधारणा करण्यास उत्सुक असेल.

- Advertisement -