Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 Auction: ग्लेन मॅक्सवेलला 'हा' संघ करू शकेल खरेदी!

IPL 2021 Auction: ग्लेन मॅक्सवेलला ‘हा’ संघ करू शकेल खरेदी!

खेळाडू लिलाव गुरुवारी होणार आहे. 

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या पुढील मोसमाआधीचा खेळाडू लिलाव (Auction) गुरुवारी पार पडणार आहे. या लिलावात २९२ खेळाडूंवर बोली लागणार असून यात १२८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. खासकरून ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ यांना कोणता संघ खरेदी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ मॅक्सवेलला खरेदी करण्यास उत्सुक असेल. मॅक्सवेल त्याच्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो आणि आरसीबीला आक्रमक शैलीत खेळणाऱ्या फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे आरसीबी संघ मॅक्सवेलला खरेदी करू शकेल असे गंभीरला वाटते.

फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची गरज

आरसीबीचा संघ ग्लेन मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी उत्सुक असेल असे मला वाटते. त्यांनी विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावरील दडपण कमी करणे गरजेचे आहे. त्यांना फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची गरज असल्याचे गंभीर म्हणाला. मॅक्सवेलला मागील वर्षी किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. परंतु, यंदा आरसीबीने त्याच्यावर विश्वास दाखवला असे गंभीरला वाटते.

मॅक्सवेल ठरू शकेल एक्स-फॅक्टर

- Advertisement -

तसेच मॅक्सवेल संघात असल्यास कोहलीला सलामीवीर म्हणून खेळता येईल, असेही गंभीर म्हणाला. कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत सलामीला आले पाहिजे. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी सपाट असून सीमारेषाही जवळ आहे. तिथे मॅक्सवेल त्याच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करू शकेल. तो आरसीबीसाठी एक्स-फॅक्टर ठरू शकेल. त्यामुळे त्याला आरसीबीने खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे.

- Advertisement -