Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा रॉयल चॅलेंजर्सच्या 'या' खेळाडूने दिली बिर्याणीची मेजवानी!

रॉयल चॅलेंजर्सच्या ‘या’ खेळाडूने दिली बिर्याणीची मेजवानी!

Related Story

- Advertisement -

आयपीएल सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आयपीएलचा फीव्हर लोकांवर सध्या जास्तच चढला आहे. त्यामुळे टीमवरील खेळाडूंवर एक वेगळाच दबाव असतो. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी आपल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमला टीममधील सिराजने आपल्या हैदराबादच्या घरी बिर्याणी पार्टीला आमंत्रित केले होते.

हैदराबादमधील तौली चौकी परिसरातल्या आपल्या घरी संपूर्ण टीमला सिराजने बोलावून बिर्याणीची मेजवानी दिली. यावेळी टीमचा कप्तान विराट कोहली, विकेटकीपर पार्थिव पटेल, स्पिनर्स युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मेजवानीची मजा लुटली.

“तुम्हा सर्वांना माझ्या घरी बोलावणे ही माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी अभिमानाची बाब आहे. तुमचा अमूल्य वेळ काढून तुम्ही जेवायला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद,” अशा कॅप्शनसह सिराजने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये विराट आणि कंपनी बिर्याणीचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

- Advertisement -

सिराज हा हैदराबादमधील एका रिक्षा चालकाचा मुलगा असून सध्याच्या आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरतर्फे खेळत आहे. बंगलोर संघाकडून सिराजसाठी २.६ करोडची बोली लावण्यात आली होती.

- Advertisement -