आर. पी. सिंहला सेंकड इनिंगसाठी ‘ऑल द बेस्ट!’

भारताचा वेगवान गोलदांज आर. पी. सिंहने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या सर्व सहखेळाडूंनी त्याला शुभेच्छा देत ट्विट केले आहे.

RP Singh retires
आर. पी. सिंग

भारताला २००७ टी-२० विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या वेगवान गोलदांज आर.पी.सिंहने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ट्विट करत ही घोषणा केली आहे. त्याने एक पत्रक लिहीत ही घोषणा केली आहे.

वाचा – वेगवान गोलंदाज आर.पी. सिंह निवृत्त

आर.पी. सिंहने आपल्या एका टी-शर्टचा ही फोटो टाकला आहे ज्यावर त्याच्या सह खेळाडूंच्या सह्या दिसून येत आहेत.


आर. पी. च्या निवृत्तीच्या निर्णयानंतर त्याचे सर्व सहखेळाडूंनी त्याला शुभेच्छा देत ट्विट केले आहे. यात विरेंद्र सेहवाग,व्ही.व्ही.एस लक्ष्मण, सुरेश रैना इत्यादींचा समावेश आहे.