जोफ्रा आर्चरने रचला इतिहास; केवळ दोन चेंडूंत कुटल्या २६ धावा, पाहा व्हिडीओ

Joffra Archer scored 26 off two balls

आयपीएलच्या १३ व्या मोसमात नवा इतिहास रचला गेला आहे. राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने नवा विक्रम रचला आहे. जोफ्रा आर्चरने २० व्या षटकांत दोन चेंडूत अक्षरश: २६ धावा कुटल्या.

पहिल्या डावात चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी २० व्या षटक टाकत होता. संपूर्ण सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या एनगिडीची जोफ्राने २० व्या षटकांत पीसे काढली. लुंगीच्या २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोफ्राने षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही जोफ्राने खणखणीत षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार वसूल केला, मात्र, पंचांनी चेंडूला नो बॉल घोषित केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार खेचला. हा चेंडूही नो बॉल होता. त्यामुळे जोफ्राने यावेळी फक्त दोन चेंडूंत २६ धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. जोफ्रा आर्चरने तर या सामन्यात फक्त आठ चेंडूंत ४ षटकारांच्या जोरावर नाबाद २७ धावांची खेळी साकारली. जोफ्रा आर्चरच्या या २० व्या षटकातील तुफानी फटकेबाजीमुळेच राजस्थानला चेन्नईपुढे २१७ धावांचे आव्हान ठेवता आले.