घरICC WC 2023रनमशीन विराट कोहलीचे वर्ल्डकपमध्ये शतकांचं अर्धशतक; सचिन तेंडुलकरचा मोडला विश्वविक्रम

रनमशीन विराट कोहलीचे वर्ल्डकपमध्ये शतकांचं अर्धशतक; सचिन तेंडुलकरचा मोडला विश्वविक्रम

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली याने अनेक विक्रम मोडले आहेत. मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा विश्वविक्रम विराट कोहली याने मोडला आहे. विराट कोहलीचे वनडे वर्ल्डकपमध्ये 50 शतक पूर्ण झाले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली याने अनेक विक्रम मोडले आहेत. मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा विश्वविक्रम विराट कोहली याने मोडला आहे. विराट कोहलीचे वनडे वर्ल्डकपमध्ये 50 शतक पूर्ण झाले आहे. याआधी भारताचा माजी खेळाडून सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विक्रम होता. सचिनने वनडे वर्ल्डकपमध्ये 49 शतक ठोकले होते. (run machine virat kohli 50 century in ODI World Cup 2023)

सचिन तेंडुलकरच्या वर्ल्डकपमधील 49 शतकांची बरोबरी केली होती. त्यानंतर आता सचिनच्याच साक्षीने आणि मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वविक्रमी 50व्या शतकाची नोंद केली. त्यामुळे क्रिकेट विश्वात विराट कोहलीच्या या खेळीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे ज्या मायानगरी मुंबईत क्रिकेटचा देव सचिन मोठा झाला, त्याच मुंबईतील वानखेडे मैदानावर विराटने सचिनच्या साक्षीने विश्वविक्रमी शतक केले.

- Advertisement -

वनडे वर्ल्डकपमध्ये मध्ये विराट कोहलीची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात त्याने महान सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला. त्याने विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा (673 धावा) विक्रम मोडला. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगचा विक्रमही मोडित काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -