घरक्रीडारशियाचा शुभारंभ : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात सौदीला ५-० ने पछाडले

रशियाचा शुभारंभ : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात सौदीला ५-० ने पछाडले

Subscribe

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात रशियाने सौदी अरेबियाला धूळ चारत ५० ने विजय मिळवला आहे. लुज्निकी स्टेडिअमध्ये खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात रशियाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व जमवले होते. रशियाच्या युरी गाजिंस्कीने १२ व्या मिनिटाला गोल करत रशियाचे खाते खोलले. त्यानंतर ४३ व्या मिनिटांला सब्स्टीट्युट म्हणून आलेला राखीव खेळाडू डेनिस चेरिशेवने गोल केला रशियाला २० ने आघाडी मिळवून दिली.

russia denis
रशियन खेळाडू डेनिस चेरिशेव

त्यानंतर दुसरा राखीव खेळाडू एरटेम डेज्यूबाने ७१ व्या मिनिटाल गोल करून रशियाला ३०ने आघाडी मिळवून दिली. खेळाच्या शेवटच्या क्षणात डेनिस चेरिशेवने पुन्हा एक गोल करत आपल्या नावावर दोन तर संघाला ४ गोल करून दिले.  यानंतर फ्री किकचा पूर्ण उपयोग करत एलेक्जेंडर गोलोविनने गोल केला आणि यजमान संघ रशियाला ५० च्या फरकाने विजय मिळवून दिला.

- Advertisement -
Russia v Saudi Arabia
फ्री किक घेताना एलेक्जेंडर गोलोविन

रशियाने यजमान पदाचा मान राखला

आतापर्यंत यजमान संघ आपला सलामी सामना जिंकत असतात हे आपण प्रत्येक ओर्ल्डकपला पहिले आहे. यावर्षीच्या २१व्या ओर्ल्डकपचा यजमान संघ रशियानेदेखील आपला पहिला सामना जिंकत हि प्रथा राखली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -