Eco friendly bappa Competition
घर क्रीडा रशियाचा 'लांडगा' झाला फिफाचा मस्कॉट

रशियाचा ‘लांडगा’ झाला फिफाचा मस्कॉट

Subscribe

झाबिवाका नामक वोल्फ (लांडगा) ठरला यावर्षीचा फिफाचे अधिकृत चिन्ह

फिफा वर्ल्डकपच्या प्रत्येक वर्षी वर्ल्डकप ज्या देशात होतो तेथील नागरिकांच्या सहमतीने एक प्राणी त्यावर्षीच्या वर्ल्डकपचे अधिकृत चिन्ह म्हणून वापरण्यात येते. ज्याला ‘मस्कॉट’ असेही म्हटले जाते. या मस्कॉटला एक भाग्यवान गोष्ट म्हणून पाहिले जाते. २०१८ चा फुटबॉल विश्वचषक यावर्षी रशिया येथे होत आहे. त्यामुळे यावेळी मस्कॉटचा मान रशियातील वोल्फ (लांडगा) या प्राण्याला मिळणार आहे. हे चिन्ह ‘मजेदार, मोहक व आत्मविश्वास वाढविणारे’ असेल अशा विश्वास वर्ल्डकपच्या आयोजकांना वाटतो. १४ जूनपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेची तयारी गेल्या बऱ्याच महिन्यांपासून रशियात सुरु आहे. यावर्षी अधिकृत चिन्ह म्हणून कोणता प्राणी निवडायचा यासाठी रशियन जनतेकडून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. ज्यात रशियन विद्यार्थी डिझायनर एकातेरिना बोचरोवा याने तयार केलेल्या लांडग्याच्या चिन्हाला हा मान मिळाला आहे.

मस्कॉटचा नक्की अर्थ काय?

‘मस्कॉट’ म्हणजे कोणतीही व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू जी चांगल्या हेतूने किंवा काहीतरी प्रस्तुत करण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह. शाळा, व्यावसायिक क्रीडा संघ, समाज, लष्करी एकक किंवा ब्रँण्ड यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरलेली कोणतेही चिन्ह म्हणजे मस्कॉट.

रेसच्या फायनलमध्ये मांजर आणि वाघही

- Advertisement -

गेल्या महिन्याभरापासून फिफाच्या अधिकृत साईटवर चालणाऱ्या या मतदान प्रक्रियेत लांडग्यासोबत मांजर आणि वाघ हे प्राणीदेखील होते. मात्र शेवटी ५३ टक्के मतं मिळवून लांडग्याने अधिकृत मस्कॉट (चिन्ह) होण्याची बाजी मारली. त्याच्या मागोमाग वाघ २७ टक्के तर मांजर २० टक्के इतकी मते मिळवण्यात यशस्वी झाले. फिफाच्या विश्वचषक स्पर्धेत अधिकृत मस्कॉटसाठी (चिन्ह) फिफाच्या वेबसाइटवर आणि रशियाच्या ‘चॅनल १’ या वृत्तवाहिनीवर एका महिन्यात एक लाखांहून अधिक लोकांनी मत नोंदवले.

mascot
मस्कॉट लांडगा, मांजर, वाघ

- Advertisement -

 

- Advertisment -